नवी मुंबई : नवी मुंबई लगत असलेल्या ठाणे बेलापूर एमआयडीसी बेल्ट मधील एका रसायन उत्पादन कंपनीत भीषण आग लागली आहे. आगीने एवढे रौद्र रूप घेतले आहे की सध्या आसपासच्या कंपन्यांना आग लागू नये याचे प्रयत्न सुरू आहेत. पाचच्या सुमारास लागलेली आग विझवण्यास आता पर्यंत चार अग्निशमन केंद्राच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

आज पाच वाजण्याच्या सुमारास रबाळे एमआयडीसी स्थित आर ४४५ भूखंडावर असलेल्या एका कंपनीत आग लागली. सदर कंपनीत रासायनिक द्रव्याशी निगडित उत्पादन घेतले जाते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात ज्वलनशील पदार्थाचा साठा कंपनीत होता. दुर्दैवाने या आगीचे लोट या साठ्या पर्यंत गेले आणि पाहता पाहता आगीने भीषण रूप घेतले. ४ वाजून ५४ मिनिटांना रबाळे अग्निशमन दल पोहचले मात्र त्यांनी तात्काळ ऐरोली अग्निशमनची मदत मागितली तर अवघ्या पाच सात मिनिटात आगीने उडालेला भडका पाहता शिरवणे आणि कोपरखैरणे अग्निशमन दलास पाचारण करण्यात आले.

हेही वाचा >>> पनवेलमध्ये शनिवारी सर्व शाळा बंद

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

VIDEO >>

आगीची तीव्रता पाहता आसपासच्या कंपन्यांना पण आगीपासून धोका निर्माण झाला असल्याने कंपन्यातील मनुष्य बळास बाहेर काढले आहे तर आग पसरू नये याची काळजी घेतली जात आहे. अशी माहिती कोपरखैरणे अग्निशमन दलाने दिली.