नवी मुंबई : नवी मुंबईतील सी उड्स येथे राहणाऱ्या एका व्यक्तीला फोनवर संदेश पाठवत एक कोटी खंडणीची मागणी केली आहे. एक कोटी न दिल्यास जीवे ठार करण्याची धमकीही देण्यात आली आहे. खंडणीची मागणी करणाऱ्याने लोरन्स विष्णोई गटाचा असल्याचा दावा केला आहे. या प्रकरणी एन आर आय पोलीस ठाण्यात संबंधित व्यक्तीं विरोधात गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.
सी उड्स येथे राहणाऱ्या एका व्यक्तीला सोमवारी रात्री सव्वा आठ वाजता एका मोबाईल क्रमांकावरून एक संदेश आला. ज्यात इंग्रजी अक्षर वापर करीत हिंदी भाषेतून एक कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे. मी गँगस्टर गोल्डी ब्रार चोवीस तासात एक कोटी रुपये देणे अन्यथा ठार मारण्यात येईल . गँगस्टर लॉरेन्स विष्णोइ ग्रुप गँगस्टर लोन ग्रुप गँगस्टर रोहित गोदरा . असे लिहण्यात आले आहे.
या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला असून तपास सुरू आहे अशी माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त मयूर भुजबळ यांनी दिली.