नवी  मुंबई : विविध कारणांनी कर्जबाजारी होऊन आत्महत्या करण्याचे प्रचंड गंभीर प्रमाण राज्यात असून यात शेतकऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. त्यात एक नवीन कारण समोर आले असून जंगली रमी खेळून कर्जबाजारी झालेल्या एका व्यक्तीने गळफास लावून आत्महत्या केली आहे. हा प्रकार पनवेल येथे घडला असून, मृत व्यक्तीने आत्महत्येपूर्वी लिहलेल्या चिठ्ठीत आत्महत्येचे कारणही नमूद केले आहे. 

घरात वा अन्य ठिकाणी बसून पैसे लावून रमी नावाचा जुगार खेळण्यावर कायद्यानुसार बंदी असली तरी ऑनलाईन रमीला परवानगी दिल्याने अनेक जण याकडे वळले आहेत. पनवेल येथे राहणारे संजय जुनात्रा (वय ५५) यांनासुद्धा ऑनलाईन रमी खेळण्याची सवय लागली. कमी कालावधीत आपण पैसे कमावू शकतो असे वाटल्याने त्यांनी रमी खेळण्यासाठी कर्ज काढले. ते पैसे हरल्याने अजून कर्ज काढले. मात्र रमीत त्यांना यश न आल्याने ते कर्जबाजारी झाले. या तणावातच त्यांनी गुरुवारी राहत्या घरी आत्महत्या केली.

हेही वाचा – एपीएमसीत कांदा वधारला; प्रतिकिलो ३-५ रुपयांची वाढ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याबाबत पोलिसांनी आत्महत्या म्हणून नोंद केली आहे. या विषयी अधिक माहिती देताना पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद पवार यांनी सांगितले की, सुनील यांना जंगली रमीत अपयश आले, त्यातून त्यांनी कर्ज काढले मात्र ते कसे फेडावे या विवंचनेत ते होते.  कर्ज काढून पैसे कमवण्याचा शॉर्टकट मारण्याचा प्रयत्न केला,मात्र तसे होऊ शकले नाही. पैसे कमवण्याच्या नादात जंगली रमीने मी पूर्ण उद्ध्वस्त झालो, त्यामुळे माझ्यावर झालेले कर्ज मी फेडू शकत नसल्याच्या नैराशेतून आपण आत्महत्या केली असून, आपल्या मरणाला आपणच जबाबदार असल्याचे सुनील यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहलेल्या चिठ्ठीत नमूद केले आहे, असेही वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद पवार यांनी सांगितले.