उरण : उलवे नोडमधील सेक्टर १० (बी) मधील पोलीस चौकीवर बुधवारी रात्री १२ साडेबारा वाजता एका इसमाने डंपरची जोरदार धडक देत नासधूस केली आहे. तसेच चौकीत उभ्या असलेल्या पोलिसांच्या वाहनासह व येथील खाजगी वाहनांचीही नासधूस केली आहे.

या घटनेत सुदैवाने कोणीही जखमी झालेले नाही. या बेदरकार वाहन चालकाला अटकाव करीत, पोलीस संरक्षणार्थ डंपरवर गोळीबार करण्यात आला आहे. न्हावा शेवा पोलीस ठाण्याच्या अंतर्गत मोडणाऱ्या या पोलीस चौकीत ही घटना घडली आहे. या घटनेचा पोलीस अधिक तपास करीत आहेत. मात्र या घटनेमुळे पोलिसांची सुरक्षाही ऐरणीवर आली आहे. उलवे नोडमधील शेलघर येथील दोन भावंडात वाद झाला. त्यानंतर या घटनेची तक्रार करण्यासाठी एक भाऊ आपला डंपर घेऊन पोलीस चौकीवर आला. त्याने पोलीस चौकी म्हणून उभ्या करण्यात आलेल्या ४० फुटी दोन कंटनेर शेडना जोराच्या धडक दिल्या, त्यामुळे या चौकीचे नुकसान झाले. हे बेदरकारपणे सुरू असलेले वाहन थांबविण्यासाठी पोलिसांनी वाहनावर गोळीबार केला. या घटनेत गस्ती पोलीस वाहनाचे नुकसान झाले आहे.

हेही वाचा – नवी मुंबई: तो मद्य प्राशन करायचा आणि एटीएम सेंटर मध्ये घुसून गारेगार हवा घेत झोपायचा …. 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

माहिती देण्यास पोलिसांची टाळाटाळ

या घटनेनंतर पोलीस यंत्रणा सक्रिय झाली आहे. मात्र यातील आरोपीचे नाव व घटनेसंबंधी माहिती देण्यास टाळाटाळ केली जात आहे.