बंद खोलीत जुगार खेळणाऱ्या आठ जणांवर सीबीडी पोलिसांनी कारवाई केली आहे. यात आठ जणांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला असून ३४ हजराची रोकड जप्त करण्यात आली आहे. जुगार कुठेही खेळला जातो मात्र अनेकांना सुरक्षित पणे  जुगार खेळावा असे वाटते हे जरी बेकायदा असले तरी पत्ते खेळत त्यावर पैसे लावणारे सुरक्षित जागेच्या शोधात असतात यातूनच हॉटेल मध्ये सहसा दुपारी रिकामी असलेली रूम  भाड्याने घेत जुगार खेळाला जातो. अशाच चोरी छुपे सुरु असलेल्या जुगार अड्यावर धाड  टाकत पोलिसांनी कारवाई केली. ज्ञानप्रकाश सिंग , विकास ठाकूर ,  नामदेव काटकर, जयनारायण यादव, मनोज भानुशाली, मोहम्मद आलम , छोटू केदार, पप्पू यादव या आरोपींच्यावर कारवाई करण्यात आली आहे. सीबीडी सेक्टर १५ येथील कार्पोरेट हॉटेल मध्ये रूम भाड्याने घेत जुगार खेळाला जात असल्या बाबत सीबीडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांना हि माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे सेक्टर १५ साईनगर इमारतील  कार्पोरेट हॉटेल मध्ये पथक पाठवले.

हेही वाचा >>> नवी मुंबई : उलवे नोड शहराला हवे स्वतंत्र पोलीस ठाणे ….

खबऱ्याने दिलेल्या माहिती नुसार पोलीस पथक थेट रूम  क्रमांक ३०६ मध्ये पोहचले. वेटर म्हणून आत प्रवेश केला मात्र दरवाजा उघडल्यावर सर्व पोलीस पथकाने आत प्रवेश केला. त्यावेळी हे सर्व आरोपी जुगार खेळात होते. तर जुगार खेळण्यासाठी सर्व सोया ज्ञानप्रकाश सिंग याने केली होती. या कारवाईत ३  पत्त्यांचे कॅट ३४ हजार ७०० रुपयांची रोकड आढळून आली. हि सर्व रक्कम जुगारात लावण्यात आलेली होती. हि रकम पट्ट्याचे कॅट पोलिसांनी जप्त केली आहेत.