रात्रीच्या काळोखात घरी दुचाकीवर जाणा-या महिलेला तीन चोरट्याने लुटण्यासाठी हल्ला केला. या हल्यानंतर धावत्या दुचाकीवरुन या रणरागीने न घाबरता तीने दुर्गेप्रमाणे जोरदार प्रतिकार केला. ती लढली आणि तीची आक्रमकता पाहुन ते चोरटे तेथून पसार झाले. मध्यरात्री या मार्गावरुन जाणा-या नागरिकांनी त्या जखमी रणरागीनीला मदतीचा हात दिला मात्र तीने प्रतिकाराचे धाडसच केले नसते तर सोन्याच्या मंगळसूत्रासह तीचे प्राण धोक्यात असते. ही घटना चार रात्रींपूर्वीची (१ अॉक्टोबर) तळोजा औद्योगिक वसाहतीमधील अग्निशमन दलाच्या केंद्रासमोरील मार्गावर रात्री साडेबारा वाजता घडली. सध्या या महिलेच्या खांद्याला व गुडघ्याला मार लागला असून तीची प्रकृती बरी आहे. या धाडसी महिलेचे नाव प्रियंका बागल – गुंड असे आहे. २६ वर्षीय प्रियंका हीच्या नंदनला कळंबोली येथील एमजीएम रुग्णालयात त्याच रात्री साडेअकरा वाजता बाळ झाल्याने त्या रुग्णालयात माता व बालकाची खबर घेऊन घरी जात असताना ही घटना घडली. प्रियंका यांनी शास्त्र शाखेतील पदवीका संपादन केले असून त्या तळोजातील एका कारखान्यात रासायनिक प्रयोगशाळा विभागात काम करतात. त्यांचे पती गोकुळ हे सुद्धा तळोजातील एका कंपनीत कामाला आहेत.

हेही वाचा >>> पनवेल : जेष्ठ नागरिकांना २७ लाख रुपयांचा ऑनलाईन गंडा

प्रियंका रुग्णालयातून निघाल्यानंतर त्यांनी पतीला फोन करुन त्या दुचाकीवरुन घरी येत असल्याची माहिती दिली. एकट्यानेच दुचाकी चालविणा-या प्रियंका हीचा पाठलाग एका दुचाकीवरुन एक अनोळखी त्रिकुट करत होते. त्यांनी तळोजा औद्योगिक वसाहतीमधील अंगाराचा फायदा उचलत प्रियंका यांच्यावर धावत्या दुचाकीवर हल्ला केला. चोरट्याने प्रियंका यांचा मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न सूरुवातीला केला मात्र प्रियंका या दुचाकीचा वेग कमी करत नसल्याचे पाहून चोरट्याने त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्रावर हात मारला. तीन चोरटे व एकट्या प्रियंका यांची दुचाकींवर सूरु असलेली झटापटीचा हा सर्व थरार तळोजातील रस्त्यावर सूरु होता. प्रियंका यांनी एका हाताने दुचाकी चालवली तर दुस-या हाताने चोरट्यांनी केलेल्या त्यांच्या हल्याला धावत्या दुचाकीवरुन प्रतिकार केला. यामध्ये त्या दुचाकीवरुन खाली कोसळल्या आणि त्यांनी चोरट्यांनाच आव्हान देत त्या किंचाळल्या.

हेही वाचा >>> ‘विजय’ आणि ‘विराट’ एपीएमसीमध्ये दाखल, पार पडला लाँचिंग सोहळा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रियंका यांची ही किंचाळी त्या रस्त्यावर जाणा-या इतर प्रवाशांनी ऐकून तेथे धाव घेतली. प्रियंका यांचे हे दुर्गेचे रुप पाहून चोरटे ही पसार झाले. एक तीन आसनी रिक्षाचालकांसह तेथे दीपक फर्टीलायझर कंपनीचे तोंडगे गावातील ठेकेदार महेश पाटील हे आले. रिक्षाचालकाने रस्त्यावर पडलेल्या प्रियंका यांना तेथून पदपथावर बसवले. त्यानंतर महेश पाटील यांनी दीपक फर्टीलायझर कंपनीच्या डॉक्टरांना तेथे आणून प्रियंका यांना डॉक्टरांनी प्रथमोपचार दिले. सध्या प्रियंका यांची प्रकृती बरी आहे.