पनवेल शहरातील महिला सूरक्षित नसल्याचा नमुणा पनवेलमध्ये पाहायला मिळाला आहे. पनवेलचे भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या निवासस्थानापासून हाकेच्या अंतरावर पायी चालणा-या महिलेच्या गळ्यातील लक्ष्मीहार चोरट्यांनी हिसकावून तेथून पळ काढला. यामुळे शहरात सोनसाखळी चोरट्यांचा धुमाकुळ सूरु असल्याची चर्चा आहे.

हेही वाचा- तांदूळ ओढणारी मशीन असल्याचे भासवून दोघांची २० लाखांची फसवणूक

नऊ दिवसांपुर्वी (१८ जानेवारी) रात्री सव्वा दहा वाजता तक्का परिसरात राहणा-या ६४ वर्षीय सुहासिनी कुर्ले या त्यांच्या कुटूंबासोबत मिडलक्सास सोसायटीच्या परिसरातून लोटस एक्सरे सेंटरनजीकच्या रस्त्याने पायी जात असताना हा प्रकार घडला. सुरुची हॉटेल येथून कुर्ले कुटूंबिय पायी चालत असताना २५ ते ३० वयोगटातील दुचाकीवरुन आलेल्या चोरट्यांच्या दुकलीने सुहासिनी यांच्या गळ्यातील हार हिसकावला. या घटनेनंतर भेदरलेल्या अवस्थेत असणा-या सुहासिनी यांची अगोदरपासून प्रकृती ठीक नव्हती. त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरु होते. अचानक हल्ला झाल्याने सुहासिनी यांची दातखिळी बसली होती. त्यामुळे कुर्ले कुटूंबियांनी प्रजासत्ताक दिनी पनवेल शहर पोलीस ठाण्यात येऊन तक्रार नोंदविली.

हेही वाचा- जो पेन्शन देईल, त्यालाच मी मत देईल’; जुनी पेन्शन हक्कासाठी कोकण भवनाला घेराव

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांची नेमणूक होऊन महिना उलटला तरीही पायी चालणा-या महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी, वाहनचोरी आणि घरफोडी यांचे प्रमाण कमी झालेले नाही. आयुक्त भारंबे यांनी पदभार स्विकारताच महिला व जेष्ठांच्या सूरक्षेविषयी विशेष खबरदारी घेणार असे आश्वासन दिले होते. पोलीस आयुक्तांनी वाढत्या चो-यांवर आळा बसण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे. प्रत्येक पोलीस ठाण्यांमध्ये स्वतंत्र तपास शाखा (डीटेक्शन ब्रॅच) पथक आहे. साध्या वेशातील हे पोलीसांचे पथक शहरातील वाढत्या गुन्हेगारींवर प्रतिबंध मिळविण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यासाठी नेमलेले असतात मात्र तरीही चो-यांचे प्रमाण वाढले आहे.