आदिवासी जमीन हस्तांतरित करण्यासाठी ठाणे जिल्हाधिकारी यांना सकारात्मक अहवाल सादर करण्यासाठी लाच मागणारा अधिकारी लाच  लुचपत विभागाच्या जाळ्यात अडकला.आरोपी हा मंडळ अधिकारी असून त्याने तक्रारदारकडे ५० हजार रुपयांची लाच मागितली होती. सुधीर पांडुरंग बोंबे असे यातील आरोपीचे नाव आहे. या प्रकरणातील तक्रारदार यांना गट न.१२९ मधील ०:५३:१० आर क्षेत्रफळाची ठाणे जिल्ह्यातील मौजे मालेगाव तालुका मुरबाड या जमिनीच्या विक्री व्यवहारासाठी आवश्यक कागदपत्रांची पुर्तता करण्या संदर्भात जमीन मालकाकडुन अधिकार पत्र प्राप्त आहे.

हेही वाचा >>> पनवेल मुंबई लोकलची गती मंदावली, हार्बर-ट्रान्सहार्बर रेल्वे प्रवाशांचे हाल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सदर मिळकत खरेदी विक्री करणारे दोघे आदिवासी असल्याने मिळकत हस्तांतरित करण्यासाठी ठाणे जिल्हाधिकारी  यांना पाठवायचा अहवाल सकारात्मक पाठवण्यासाठी आरोपीने तक्रारदार यांचेकडे ७० हजार रुपयांची लाच मागितली होती. याबाबत तक्रारदार यांनी नवी मुंबई लाच लुचपत विभागाकडे तक्रार केली. या प्रकरणाची पडताळणी केली असता लाच मागितल्याने समोर आले. त्यामुळे लाच लुचपत विभागाने ४ ऑक्टोबरला सापळा रचला. तत्पूर्वी तक्रारदार आणि आरोपी  बोंबे यांनी तक्रारदार यांच्याशी झालेल्या संभाषणा दरम्यान ६० हजार रुपये लाचेची मागणी करून तडजोडी अंती ५० हजार रुपये लाच आरोपीने  स्वीकारली.  त्यावेळी त्यांना पथकाने रंगेहात पकडले. सदर कारवाई पोलीस उपअधीक्षक  शिवराज म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.