पनवेल परिसरातून बिबट्याच्या कातडीची तस्करी करणाऱ्या आरोपी अटक करण्यात आली आहे. आरोपी कडून बिबट्याची कातडीही जप्त करण्यात आली आहे. वन्यजीव प्राणी संरक्षक कायद्यांतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे.

हेही वाचा- नवी मुंबई महापालिकेच्या लार्सन अ‍ॅण्ड टुब्रो कंपनीसाठी १.६५ कोटी खर्चाच्या रस्त्याच्या पायघड्या? गरज नसताना निविदांचा घाट

three thousand families staying near waldhuni river boycotting lok sabha election, construction within river bed
कल्याणमध्ये वालधुनी नदी परिसरातील तीन हजार कुटुंबीयांचा लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार
vasai fort leopard
वसई किल्ला परिसरात बिबट्याची दहशत कायम, संध्याकाळ नंतर रोरो सेवा बंद करण्याची सुचना
vasai fort, compound fencing on vasai fort
वसई किल्ल्याभोवती संरक्षक जाळ्यांचे कुंपण, गैरप्रकार रोखण्यासाठी पुरातत्व विभागाच्या उपाययोजना
Leopard in Vasai Fort area fear among citizens
वसई किल्ला परिसरात बिबट्याचा वावर… नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण; वनविभागाकडून शोध सुरू

जितेंद्र खोतू पवार उर्फ संजु असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. बिबटया हा वन्य प्राणी अन्नसाखळी मधिल महत्त्वाचा घटक आहे, त्याची तस्करी होवून तो नामशेष झाला तर पूर्ण अन्नसाखळी व पर्यावरणावर त्याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पनवेल परिसरातील कर्नाळा अभयारण्य भागात अनेक प्राणी प्रजाती आढळतात. त्यामुळे या परिसरात अशा प्राण्याची शिकार, अवयवांची तस्करी  करणाऱ्या कृत्यांना आळा विशेष प्रयत्न केले जातात.  

हेही वाचा- गद्दार गेल्यानंतर शिवसेना आणखी मजबूत झाली; आमदार भास्कर जाधव आणि आंबदास दानवेंची मेळाव्याला दांडी

२८ फेब्रुवारीला  गुन्हेशाखा, कक्ष-२ पनवेल येथे कार्यरत  पोलीस हवालदार अनिल पाटील यांना  गोपनिय बातमीदारामार्फत माहीती मिळाली की, मुंबई गोवा हायवे रोडवरील खारपाडा टोलनाका जवळील वैश्णवी हाॅटेल जवळ एक इसम दुर्मिळ प्रजातीचे नामशेष होत असलेले संरक्षित वन्यजीव बिबटयाची कातडी अनाधिकृतरीत्या जवळ बाळगुन विक्री करण्यासाठी येणार आहे.  त्या अनुशंगाने मिळालेल्या बातमीची खातर जमा करून वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र पाटील यांनी  एक पोलीस पथक तयार करून पंच, वन विभागाचे अधिकारी व छाप्यासाठी लागणाऱ्या साहित्यासह नमूद ठिकाणी रवाना झाले. ज्या ठिकाणी संशयित व्यक्ती येणार होता त्या ठिकाणी सापळा लावण्यात आला होता. काही वेळाने एक इसम त्याचे उजव्या खांदयावर बॅग लटकवुन खारपाडा ब्रिज बाजुने खारपाडा टोलनाकाकडे येत असताना दिसला. त्याला पाहताच सोबत असलेल्या बातमीदाराने  ठरल्या प्रमाणे इशारा केला. सदरचा इसम हा खारपाडा टोलनाका येथील मुंबई बाजुचे डावेलेनवर आला असता पोलीस पथकाने नमुद इसमाला पळुन जाण्याची संधी न देता त्याला ताब्यात घेतले. त्याच्या अंगझडतीत आढळून आलेल्या पिशवीची तपासणी केली असता त्यात बिबट्याची कातडी आढळून आली.

हेही वाचा- नवी मुंबई: तीन वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करणारा नराधम अटकेत; पनवेलमधील धक्कादायक घटना

याबाबत  नवीन पनवेल पोलीस ठाणे येथे  वन्यजीव संरक्षण अधिनियम नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.  आरोपीने ही कातडी कोठून आणली, बिबट्याला स्वतः मारले की अन्य कोणी ठार केले, या पूर्वी असा प्रकार आरोपीने केला आहे का ? आदी बाबत तपास सुरू आहे. अशी माहिती गुन्हे शाखेचे उपायुक्त अविनाश काळे यांनी दिली.