नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेने शासन निर्णयानुसार, माध्यमिक शाळा भरण्याची वेळ सकाळी १०.५० ते ४.२५ केली होती. त्यानुसार पहिल्या सत्रात शाळा सुरू होत्या. परंतु आता सोमवारपासून दिवाळीनंतर माध्यमिक विभागाच्या शाळा भरण्याच्या वेळेत पुन्हा बदल करण्यात आला असून पालिकेच्या माध्यमिक विभागाच्या शाळांची वेळ पुन्हा आधीप्रमाणेच सकाळी ८ ते दुपारी २ करण्यात आली आहे. माध्यमिक शाळांची वेळ पूर्वीप्रमाणेच करण्याची मागणी पालक व शिक्षक संघटनांनी लावून धरली होती.

राज्य शासनाच्या ८ फेब्रुवारी २०२४ च्या पत्रकानुसार सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांनी पूर्वप्राथमिक ते इयत्ता ४ थी पर्यंतचे वर्ग सकाळी ९ किंवा ९ नंतर भरवण्याचे निर्देश दिले होते. या शासनाच्या निर्देशानुसार राज्यभरात १५ जून २०२४ या नव्य शैक्षणिक वर्षापासूनच या नियमाची अंमलबजावणी करण्यात आली होती. नवी मुंबई महापालिकाक्षेत्रात महापालिकेच्या ५० पेक्षा अधिक शाळा असून ५० हजारापेक्षा अधिक विद्यार्थी पालिकेच्या शाळेत शिक्षण घेत आहेत. सुरुवातीला शाळांच्या वेळा बदलाला शिक्षक संघटनांनी विरोध केला होता. परंतु पालिका प्रशासन निर्णयावर ठाम होते. माध्यमिक शाळांच्या वेळेत पालिकेने बदल केला असून दुसरीकडे प्राथमिक विभागाच्या शाळांच्या वेळेतही बदल करण्याची मागणी शिक्षक संघटनांनी केली आहे. प्राथमिक विभागाच्या शाळा पटसंख्येमुळे विविध वेळेत भरत आहेत.

हेही वाचा…मैदाने नव्हे; प्रचारानंतरच्या ‘श्रमपरिहारा’ची ठिकाणे! महापालिका, पोलिसांनी खबरदारी घेण्याची आवश्यकता

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमिक शाळांच्या वेळा बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. माध्यमिक शाळांची वेळ पहिल्याप्रमाणेच करण्याची मागणी पालक व शिक्षक संघटनांनी केली होती. त्यानुसार पालिकेच्या माध्यमिक शाळा सोमवारपासून सकाळी ८ ते २ वेळेनुसार सुरू करण्यात आल्या आहेत. संघरत्ना खिल्लारे, उपायुक्त शिक्षण, नवी मुंबई महापालिका