नवी मुंबई : सीबीडी विभागात रविवारी रात्रीपासून सकाळी साडेआठ वाजेपर्यंत ७२ मि.मी. आणि सोमवारी सकाळी ८.३० पासून ४.३० वाजेपर्यंत ८ तासात १३२ मिलिमीटर असा ढगफुटी सदृश्य पाऊस कोसळल्याने बेलापूर विभागात सखल भगात असलेल्या सेक्टर ४ ५,११ मध्ये पाणी साचून नागरिक व दुकानदारांचे हाल झाले. या भागातील पाणीचा निचरा झाल्यानंतर जीवन हळूहळू पूर्ववत स्थितीत येत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. सकाळपासूनच दुकानदारांनी आपल्या दुकानाबाहेरील परिसर स्वच्छ करण्यास सुरुवात केली आहे.
काल संपूर्ण रात्रभर सीबीडी बेलापूर सेक्टर ११, ४,५, ६ भागातील पाणी उपसण्याचे काम विविध ठिकाणी मोठ्या क्षमतेचे पाणी उपसा पंप लावून निरंतर करण्यात आल्याने आता जनजीवन हळूहळू पूर्ववत होत आहे. नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार तातडीने उपाययोजना हाती घेत काल सेक्टर १२ येथील होल्डिंग पॉंडच्या ठिकाणी १०० एचपीचे ३ पंप लावून होल्डिंग पॉड मधील पाणी उपसा खाडीमध्ये करण्यास तातडीने सुरुवात करण्यात आली.
या पंपांच्या संख्येत वाढ करण्यात येत आहे. त्यासोबतच होल्डिंग पॉंडमधून पाणी खाडीमध्ये जाण्याचा जो मार्ग आहे तो सुद्धा जेसीबी लावून रूंद करण्यात आला, त्यामुळे पाणी निचरा होण्यास सुरुवात झाली संपूर्ण रात्रभर सीबीडी बेलापूर सेक्टर ११, ४,५, ६ भागातील पाणी उपसण्याचे काम विविध ठिकाणी मोठ्या क्षमतेचे पाणी उपसा पंप लावून निरंतर सुरू केल्याने आता नागरिक तसेच व्यावसायिक यांचे जनजीवन पूर्ववत होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. परिसरात काल पावसामुळे पाणी दुकानात व तळमजल्यांवरील घरात गेल्यामुळे व्यापारी व नागरिकांचे हाल झाले होते. परंतु सकाळपासून पाणी कमी झाल्यानंतर सीबीडी परिसरातील व्यापाऱ्यांनी दुकानाबाहेरील परिसर स्वच्छ करण्यास सुरुवात केली असल्याने हळूहळू जीवन पूर्वपदावर येत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
दुकानाबाहेर परिसरात व दुकानात मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्याने दुकानदारांचे हाल झाले व मोठ्या प्रमाणात नुकसानही झाले. आज सकाळपासून दुकानदारांनी दुकानाबाहेर परिसर दुकानातील घाण स्वच्छ करण्यास सुरुवात केली आहे. – बाबुभाई परमार, ज्वेलर्स व्यापारी, सीबीडी सेक्टर ४