नवी मुंबई महानगरपालिकेच्या पर्यावरण स्थिती अहवालानुसार २०१६-१७ या आर्थिक वर्षांत नवी मुंबई शहराच्या पर्यावरणात लक्षणीय सुधारणा झाली आहे. ऐरोली हा हवा गुणवत्तेच्या दृष्टीने राज्यातील सर्वोत्तम विभाग ठरला आहे. पर्यावरण गुणवत्ता निर्देशांक (एदक — ७३.६६) आणि पर्यावरण कामगिरी निर्देशांक (एढक झ्र् ६७२.५०) यामध्ये मागील वर्षांच्या तुलनेत अनुक्रमे २.७ आणि ७.९ अंकांनी वाढ झाली आहे. या वाढीमध्ये हवा व पाणी गुणवत्तेमधील सुधारणा, घनकचऱ्याचे वर्गीकरण व पुनर्वापर, पाण्याच्या गुणवत्तेची देखभाल, पाण्याच्या अपव्ययातील घट, खारफुटीचे संरक्षण, व नागरिकांचा सहभाग अशा विविध घटकांचा सहभाग आहे, अशी माहिती पालिकेने दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पर्यावरण स्थिती अहवालानुसार सन २०१६-१७ मध्ये नवी मुंबई शहरातील सोडियम ऑक्साइड, नायट्रोजन ऑक्साइड व ओझोन च्या  प्रदूषकांचे प्रमाण केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळने निश्चित केलेल्या निकषांपेक्षा कमी आहे. नवी मुंबईत वातावरणातील धुलीकणांचे प्रमाण निकषांपेक्षा जास्त असले तरी मागील वर्षीच्या तुलनेत धुलीकणांच्या प्रमाणात घट झाली आहे. ही घट होण्यामागे मुख्यत्वे औदयोगिक क्षेत्रातील रस्ते बांधणीच्या कामांची पूर्तता, २२ उद्योग समुहांमध्ये पारंपरिक इंधनाऐवजी पाईप नॅचरल गॅसच्या इंधन वापरामुळे इंधन ज्वलनात घट होऊन हवा प्रदुषकांच्या प्रमाणात झालेली घट, दगडांपासून खडी निर्माण करण्याच्या उद्योगांत धूलिकण प्रतिबंध उपाययोजना तसेच अनेक दगडखाणींच्या कराराची मुदत संपुष्टात आल्याने त्या बंद करणे या कारणांमुळे झाली आहे. तुर्भे येथील घनकचरा व्यवस्थापन, ई-कचरा नियोजन हे देखील फायद्याचे ठरत आहे.

त्याच बरोबर २० ‘स्मार्ट ई टॉयलेट’ तसेच महिलांकरीता विविध सुविधांनी युक्त स्मार्ट ‘शी’ टॉयलेट उभारण्यात आली आहेत. त्यासोबतच १४१ सार्वजनिक आणि ३४७ सामुहिक शौचालये उभारली आहेत, त्यातून केंद्र सरकारमार्फत नवी मुंबईला हागणदारीमुक्त शहर  जाहीर करण्यात आले आहे. १६ वर्षांपासून नवी मुंबई महानगरपालिका पर्यावरण स्थिती अहवाल सादर करत आहे. यावर्षीचा अहवाल उर्जा आणि संसाधने संस्था (ळएफक) या पर्यावरण क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामांकीत संस्थेने तयार केला आहे.  महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, महाराष्ट्र शासनाच्या विकासपुरक घटक, संसाधनांवरील ताण, परिणाम आणि प्रतिसाद या मार्गदर्शक तत्त्वांवर आधारीत तपासणी करण्यात आली आहे. या अहवालातून पर्यावरणावर विविध कारणांनी येणार ताण, त्यामुळे होणारा परिणाम, पालिकेमार्फत करण्यात आलेली कार्यवाही हा तपशील आहे.

प्रदूषणाच्या दिवसांत घट

अहवालानुसार नवी मुंबईतील हवेची गुणवत्ता सुधारली आहे. २०१५-१६मध्ये वर्षभरात ८५ दिवस हे प्रदूषण दिवस म्हणजे प्रदूषणाचे प्रमाण अधिक असलेले दिवस होते. त्या तुलनेत २०१६-१७ मध्ये ३० दिवस प्रदूषण दिवस होते. म्हणजेच हे प्रमाण कमी झाले आहे, असे अहवालातून निदर्शनास आले आहे. सनियंत्रीत हवा गुणवत्ता केंद्रातील मापनानुसार ऐरोली विभागात सर्व प्रदुषके प्रमाणात असल्याचे आढळले आहे. त्यामुळे ऐरोली हा हवा गुणवत्तेच्या दृष्टीने राज्यातील सर्वोत्तम विभाग ठरला आहे.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Airoli air best in maharashtra airoli environment
First published on: 18-08-2017 at 02:20 IST