नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या दक्षिण धावपट्टीवर वैमानिकांना विमान उतरविण्यावेळी धावपट्टीचा अचूक अंदाज मिळण्यासाठी धावपट्टीवरील दिव्यांच्या मार्गाची अचूक सूचना देणाऱ्या यंत्रणेची चाचणी एका लहान विमानाच्या साह्याने गुरुवारी सकाळी साडेआठ वाजता घेण्यात आली. ही चाचणी यशस्वी झाल्याची माहिती नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्राधिकरणाने (एनएमआयए) गुरुवारी सायंकाळी त्यांच्या समाजमाध्यमांवरील संकेतस्थळावर प्रसिद्ध केली होती. ही चाचणी यशस्वी झाल्याने विमानतळाच्या दक्षिण धावपट्टीवर लवकरच मोठे विमान उतरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

हेही वाचा >>> पनवेल: शास्तीमाफीसाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा

भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या सहकार्याने गुरुवारी सकाळी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या दक्षिण धावपट्टीवरील ०८/२६ येथे चाचणी घेण्यात आली. गुरुवारी सकाळी तब्बल दोन तास धावपट्टीवर लहान विमान चाचणीसाठी घिरट्या घालत होते. विमान उतरविण्यासाठी वैमानिकांना धावपट्टीवरील मार्गाचा अचूक संदेश सूचकता दर्शविणाऱ्या दिव्यांचा आधार घ्यावा लागतो. धावपट्टीवरील दिवे मार्गातील अचूक सूचनेमुळे वैमानिकांना धावपट्टीवरील दृष्यमानता कमी असताना याच दिव्यांच्या आधारे विमान उतरवावे लागते. त्यामुळे या चाचणीला विशेष महत्त्व आहे. गुरुवारी ही चाचणी पूर्ण झाल्याने पुढील चार महिन्यात नवी मुंबई विमानतळावरुन विमानाचे उड्डाण होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

हेही वाचा >>> नेरुळ, घणसोलीतील बेकायदा बांधकामांवर कारवाई; महापालिकेच्या नोटिशीकडे दुर्लक्ष करून बांधकामे

तत्कालिन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये ११ ऑक्टोबरला नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर पहिले लढाऊ विमान सी- २९५ हे उतरविण्यात आले होते. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर दोन धावपट्टी आहेत. त्यातील दक्षिण धावपट्टी पहिल्या टप्यात सुरू होणार आहे. या धावपट्टीची ३७०० मीटर लांबीची आणि ६० मीटर रुंदीची आहे. पहिल्या टप्यात मालवाहू विमानतळ या विमानतळावरुन सुरू होणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चाचणीचे महत्त्व विमान उतरविण्यासाठी वैमानिकांना धावपट्टीवरील मार्गाचा अचूक संदेश सूचकता दर्शविणाऱ्या विज दिव्यांचा आधार घ्यावा लागतो. धावपट्टीवरील दिवे मार्गातील अचूक सूचनेमुळे वैमानिकांना धावपट्टीवरील दृष्यमानता कमी असताना याच दिव्यांच्या आधारे विमान उतरवावे लागते. त्यामुळे या चाचणीला विशेष महत्त्व आहे.