नवी मुंबई: मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून सेक्टर १९ येथे शीतगृह बांधण्यात आहे आहेत. हे शीतगृह बाजार समिती भाड्याने देणार असून त्याची निविदा प्रकिया राबविण्यात येणार असून तसा प्रस्ताव बुधवारी होणाऱ्या संचालक मंडळाच्या बैठकीत ठेवण्यात आला आहे.

आशिया खंडातील सर्वात मोठी बाजार पेठ म्हणून मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीला ओळखली जाते. त्यामुळे येथे हजारो शेतकरी आपला शेतमाल विक्रीसाठी आणतात. त्यानंतर येथील व्यापारी तो शेतमाल खरेदी करून त्याची दुबार विक्रीद्वारे मुंबई आणि उपनगरात वितरीत करतात त्यासोबतच बराच शेतमाल, तसेच सुका मेवा बाहेर देशात निर्यात केला जातो.

हेही वाचा… अपंग व्यक्तीचा स्टॉलसाठी पनवेल पालिकेसमोर रॉकेल अंगावर घेण्याचा प्रयत्न

मात्र अशा मालाची साठवणूक करण्यास शीतगृहाची गरज लागते. म्हणून येथील व्यापारी खासगी शीतगृहाचा आसरा घेतात. त्यामुळे व्यापाऱ्यांच्या सोयीच्या दृष्टीने बाजार समितीने सेक्टर १९ भूखंड क्रमांक २ वर शितगृह बांधण्याचा निर्णय घेतला. त्यास २०१३ ला प्रशासकिय मंजुरी घेतली. हे शीतगृह ३० कोटी खर्च करून २०१८ ला बांधून तयार होते. मात्र भोगवटा प्रमाणपत्राअभावी ते सुरू करण्यात आले नव्हते.

हेही वाचा… पनवेल पालिकेच्या ३७७ जागांसाठी १ लाख १५ हजार अर्जांची नोंदणी; अर्ज नोंदणीचे शेवटचे तीन दिवस शिल्लक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मात्र आता या इमारतीस भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे, अशी माहिती सहाय्यक अभियंता मेहबूब व्यापारी यांनी दिली. त्यामुळे सल्लागार मे.न्युट्रिस प्रोजेक्ट इंजिनियर्स, कन्सल्टन्स यांनी सदर केलेल्या मूल्यांकनानुसार बाजार समिती हे शीतगृह भाड्याने देण्यासाठी निविदा प्रकिया राबवणार आहे. आज होणाऱ्या संचालक मंडळाच्या बैठकीत प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. त्यामुळे बाजार आवारातच शेतमाल ठेवण्यासाठी व्यापाऱ्यांना लवकरच शीतगृह उपलब्ध होणार आहे.