सप्टेंबरमध्ये बिग बटरफ्लाय महिना म्हणून साजरा केला जात असून शनिवारी आवरे येथील रामचंद्र म्हात्रे विद्यालयात यानिमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये जनजागरण करण्यात आले. निसर्गातील महत्वाचा घटक आणि परागीभवन प्रक्रियेतील निर्णयाक भूमिका नजभावणाऱ्या फुलपाखरा बाबत जनजागरण करण्यात आले. यावेळी चिरनेर येथील  फ्रेंड्स ऑफ नेचर(फॉन) यांच्या वतीने उरण तालुक्यातील आवरे येथील रामचंद्र म्हात्रे विद्यालय आणि ज्युनिअर कॉलेज मध्ये फुलपाखरांविषयी  माहिती देण्यात आली.

हेही वाचा >>> बेलापूर ते पनवेल दरम्यान एनएमएमटीची जादा बस सेवा

यामध्ये फुलपाखरांची ओळख त्यांचे जीवनचक्र त्यांचे महत्त्व, आपल्या परिसरातील फुलपाखरांच्या प्रजातीची माहिती, फुलपाखरांच्या विषयी आकर्षक तथ्ये, फुलपाखराचे सद्यस्थितीत, त्यांचे संरक्षण,रहिवास,अदिवास त्याचप्रमाणे स्थलांतर यांचा  अभ्यास वैज्ञानिक पद्धतीने कसा केला जातो या विषयी माहिती संस्थेचे सदस्य  फॉन संस्थेचे कार्यकर्ते निकेतन रमेश ठाकूर यांनी विद्यार्थ्यांना फुलपाखरा विषयी सविस्तर माहिती दिली. संस्थेचे  अविनाश गावंड व हृषिकेश म्हात्रे हे उपस्थित होते. तसेच रामचंद्र म्हात्रे विद्यालय व ज्यू.कॉलेज चे प्राचार्य सुभाष ठाकूर व शिक्षक श्रीनिवास गावंड,देवेश म्हात्रे व इतर शिक्षकांचे या कार्यक्रमासाठी सहकार्य लाभले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.