उरण : भूमिपुत्रांना व स्थानिकांना नेस्तनाबूत करणाऱ्या समाजातील लुटारू प्रवृत्तीपासून प्रकल्पग्रस्तांनी सावध व्हावे आणि स्वयंविकास करून भावी पिढीचे भविष्य सुरक्षित करावे, असे आवाहन जेष्ठ नगररचनाकार माजी आमदार चंद्रशेखर प्रभू यांनी रविवारी उरणच्या जेएनपीटी कामगार वसाहतीच्या बहुद्देशी सभागृहात आयोजित मेळाव्यात केले.

जेएनपीटी प्रकल्पग्रस्तांच्या साडेबारा टक्के विकसित भूखंडाचा ताबा मिळावा या प्रमुख मागणीसाठी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जेएनपीटीचे माजी कामगार विश्वस्त कॉ. भूषण पाटील यांनी जेएनपीटी साडेबारा टक्के विकसित भूखंडाची मागणी आणि त्यासाठी लोकनेते दि.बा. पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या लढ्यातील हुतात्मे व जनतेच्या त्यागातून आणि कामगारांच्या पाठिंब्याने यश प्राप्त झाल्याचे स्पष्ट केले. त्याचप्रमाणे साडेबारा टक्के विकसित भूखंडाचा ताबा यासाठी आंदोलनाची घोषणा केली. त्याचप्रमाणे त्यांनी प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न आणि समस्याना उत्तर दिले.

सर्वसामान्य सर्वस्व गमावणाऱ्या प्रकल्पग्रस्तांनी आपण आपल्या पुढच्या पिढीचे देव आहात, तुमच्या पूर्वजांनी तुमच्यासाठी जमिनी रखाल्या होत्या. आता तुम्ही ठरवायचे तुमची पिढी व्यसनाच्या आहारी घालवून हाती आलेली संपत्ती घालवायची की ती टिकवून ठेवायची, हे तुम्हाला ठरवायचे आहे. त्यासाठी भूखंडाच्या स्वयंविकासाचा मार्ग अनेक ठिकाणी प्रत्यक्षात अंमलात आणला असल्याचे असे चंद्रशेखर प्रभू यांनी स्पष्ट केले. त्यांनी मुंबईतील अनेक सोसायटीची उदाहरणे देऊन ती पाहून नंतर निर्णय घ्या, माझं काम हे समाजात परिवर्तन आणि सुप्त क्रांतीचे आहे. त्यासाठी नियोजनकार म्हणून एकही पै न घेता काम करीत आहे. येथील मूळ समाजाच्या अस्तित्वाचे हे काम अविरत सुरूच ठेवणार असल्याचे मत त्यांनी या मेळाव्यात प्रकल्पग्रस्तांना मार्गदर्शन करताना केले.

हेही वाचा – टेम्पो सोडवण्याची लाच मागणारे ४ वाहतूक पोलीस कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात

मेळाव्यात जेष्ठ साहित्यिक एल.बी. पाटील, किसान सभेचे रायगड जिल्हा अध्यक्ष रामचंद्र म्हात्रे, उरण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुधाकर पाटील, व संतोष पवार यांची भाषणे झाली. तर सुरेश म्हात्रे यांनी आभार प्रदर्शन केले.

हेही वाचा – नवी मुंबई : सोमवारी संध्याकाळी व मंगळवारी सकाळी शहरातील पाणीपुरवठा राहणार बंद

२३ मे पासून प्रकल्पग्रस्तांचे उपोषण :

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जेएनपीटी प्रकल्पग्रस्तांच्या साडेबारा टक्के विकसित भूखंडाचे त्वरित वाटप सुरू करा, या प्रमुख मागणीसाठी २३ मे पासून जेएनपीए प्रशासन भवना बेमुदत उपोषण समोर करण्याचा निर्णय या मेळाव्यात घेण्यात आला.