नवी मुंबई : सोन्याच्या पेढीत दागिने पाहण्याच्या निमित्ताने आलेल्या काही महिलांनी तीन तोळे वजनाच्या दोन बांगड्या चोरी केल्याचे समोर आले आहे. ही घटना १० ऑगस्ट रोजीची असून पेढीतील नियमित ऐवज तपासणी करीत असताना बांगड्या आढळून आल्या नाही. सीसीटीव्ही तपासणी केली असता हा प्रकार उघडकीस आला. मांगी हिम्मतराम माली असे यातील फिर्यादीचे नाव आहे. ते वाशीतील मयुरा ज्वेलर्समध्ये काम करतात.

१० ऑगस्ट रोजी त्यांनी नेहमीप्रमाणे दुकान उघडले. दिवसभर सोन्याचे दागिने विक्री करण्याचे नियमित काम झाल्यावर रात्री साडे नऊच्या सुमारास दुकान बंद करून घरी गेले. दुकान बंद केल्यावर दागिन्यांची पडताळणी केली असता शिल्लक दागिन्यांमध्ये अंदाजे तीन तोळ्याच्या दोन बांगड्या मिळुन आल्या नाही. दुसऱ्या दिवशी शुक्रवार असल्याने दुकानाला सुट्टी होती, त्यामुळे घटनेकडे दुर्लक्ष झाले. मात्र १२ तारखेला सीसीटीव्ही तपासणी केली असता १० तारखेला दुपारी सव्वादोनच्या सुमारास तीन बुरखाधारी महिला दुकानात आल्या.

हेही वाचा : वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी सुरू केलेल्या उड्डाणपुलावर कोंडीचा सामना, रोजच्या कोंडीने प्रवासी त्रस्त

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्यांनी सोन्याच्या बांगड्या खरेदी करायच्या आहेत, असे सांगितल्याने दुकानातील अनिल जैन यांनी त्यांना सर्व प्रकारच्या बांगड्या दाखवल्या. त्यानंतर त्यातील एका महीलेने त्या बांगड्या तिच्या हाताखाली लपवुन ठेवल्या. तिने नंतर त्या बांगड्या बुरख्याच्या आत लपवल्या. त्याचवेळी दुसऱ्या व तिसऱ्या महीलेने दुकानदाराला बोलण्यात गुंतवुन ठेवले होते. दुकानातुन दोन सोन्याच्या एकूण तीन तोळ्याच्या बांगड्या चोरी झाल्याचे समोर आले आहे. एकूण १ लाख ९५ हजार रुपये किंमतीच्या २२ कॅरेटच्या तीन तोळे वजनाच्या दोन बांगड्या चोरीला गेल्या. या प्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून २९ ऑगस्ट रोजी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.