डॉ. आंबेडकरांची १२५ वी जयंती आणि रामनवमीचे औचित्य साधून नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रम (एनएमएमटी) पनवेल आणि करंजाडे येथील प्रवाशांना सोयीची असणारी ७६ क्रमांकाची बससेवा शुक्रवारी सकाळी १० वाजल्यापासून सुरू करत आहे. सिटिझन युनिटी फोरम (कफ) या संघटनेच्या पाठपुराव्यामुळे ही बससेवा एनएमएमटीने सुरू केली आहे. या बससेवेमुळे हजारो प्रवाशांना ७ आणि ९ रुपयांत थेट पनवेल रेल्वेस्थानकात जाता येईल. करंजाडे येथील प्रवाशांना रेल्वेस्थानकापर्यंत थेट जाण्यासाठी यापूर्वी तीन आसनी रिक्षाचालक ६० रुपये घेत होते.
शुक्रवारी सकाळी पनवेल वसाहतीमधील शिवाजी चौकात साडेदहा वाजता होणाऱ्या बससेवेच्या शुभारंभाला एनएमएमटीचे सभापती साबू डॅनियल यांच्या हस्ते हा सोहळा पार पडणार आहे. एनएमएमटीने ७६ क्रमांकाच्या मार्गावर दोन बसगाडय़ा चालवण्याचे प्रायोगिक तत्त्वांवर ठरविले आहे. १७ मिनिटांनी एक बस या मार्गावर धावणार असल्याने पनवेलच्या चाकरमान्यांची रेल्वेस्थानकापर्यंत जाण्याची रोजची पायपीट थांबणार आहे. केवळ सात रुपयांत रेल्वेस्थानकात जाऊ शकतील.
संग्रहित लेख, दिनांक 14th Apr 2016 रोजी प्रकाशित
पनवेल रेल्वेस्थानक ते करंजाडे बससेवा
सिटिझन युनिटी फोरम (कफ) या संघटनेच्या पाठपुराव्यामुळे ही बससेवा एनएमएमटीने सुरू केली आहे
Written by झियाऊद्दीन सय्यद

First published on: 14-04-2016 at 03:14 IST
Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bus service from panvel railway station to karanjade