नवी मुंबई महानगरपालिकेच्या परिवहन समिती व आठ विशेष समिती सभापतीच्या पदांची निवड झाली. परिवहन समिती सभापती मोहन म्हात्रे यांची निवड झाली. महिला व बालकल्याण समिती सभापती सायली शिंदे, पाणीपुरवठा व मलनिस्सारण समिती सभापती निवृत्ती जगताप, आरोग्य परिक्षण व वैद्यकीय सहाय्य समिती सभापती सलुजा सुतार, क्रिडा व सांस्कृतिक कार्यक्रम समिती सभापती लिलाधर नाईक, समाजकल्याण व झोपडपट्टी सुधार समिती सभापती रमेश डोळे, विधी समिती सभापती गणेश म्हात्रे, विद्यार्थी व युवक कल्याण समिती सभापती सिमा गायकवाड, उद्यान व शहर सुशोभिकरण समिती सभापती पदासाठी तनुजा मढवी यांची निवड करण्यात आली आहे. तर आरोग्य परिक्षण समिती उपसभापती उषा भोईर, महिला व बालकल्याण समिती उपसभापती सुजाता पाटील, पाणी पुरवठा व मलनि:स्सारण समिती उपसभापती मोनिका पाटील, समाजकल्याण व झोपडपट्टी सुधार समिती उपसभापती मुद्रीका गवळी, विधी समिती उपसभापती श्रध्दा गवस, विद्यार्थी व युवक कल्याण समिती उपसभापती संध्या यादव, उद्यान व शहर सुशोभिकरण समिती उपसभापती जयश्री ठाकुर यांची निवड झाली.