नवी मुंबई : मोरबे धरणातून पाणीपुरवठा होणारी मुख्य जलवाहिनी शनिवारी आदई गावाजवळ फुटल्याने तातडीने काम करण्यात आले. मात्र यादरम्यान शनिवारी सायंकाळी नवी मुंबई शहरातील पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला होता. तर रविवारी सकाळी नेहमीप्रमाणे पाणीपुरवठा करण्यात आला, मात्र एकदम लालसर, गडुळ अस्वच्छ पाणी आल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे.
हेही वाचा – मुंबईत ये-जा करणारी जलसेवा तिसऱ्या दिवशी बंद, रस्ते वाहतुकीवरील भार वाढला
नवी मुंबई शहरातील नागरिकांना मोरबे धरणातून पाणीपुरवठा होत असतो. याठिकाणी जलशुद्धीकरण केंद्र तसेच शहरातील नागरिकांना स्वच्छ पाणीपुरवठा होण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जातात. मात्र तरीही शहरात सातत्याने अस्वच्छ पाणीपुरवठा होतच असतो. बुधवारी शहरात शटडाऊनमुळे पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला होता. त्यामुळे गुरुवारी कमी दाबाने पाणी आले. पंरतु तिसऱ्या दिवशी पुन्हा शनिवारी आदई गावाजवळ मुख्य जलवाहिनी फुटल्याने तातडीने काम करण्यासाठी सायंकाळी शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला होता. रविवारी सकाळी नळाला एकदम लालसर मातीचे पाणी आल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त करीत अस्वच्छ पाणीपुरवठा का करता? असा प्रश्न उपस्थित केला आहे.