नवी मुंबई – गेल्या महिन्यापासून वातावरणातील उष्ण-दमट हवामानाने नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम जाणवत आहे. नवी मुंबई शहरात आता साथीच्या विशेषतः डेंग्यू, मलेरिया आजारांनी डोके वर काढले असून जून महिन्यापेक्षा जुलैमध्ये साथीचे आजार बळावले आहेत.

नवी मुंबईमध्ये डेंग्यू, मलेरिया रुग्णांत वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. जूनमध्ये मलेरियाचे २ तर जुलैमध्ये १५ रुग्ण आढळले आहेत. तर संशयित डेंग्यू रुग्णांत वाढ झाली असून जूनमध्ये ११५ तर जुलैमध्ये १८५ रुग्ण असून आतापर्यंत २ डेंग्यूचे रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत, अशी माहिती महापालिका आरोग्य विभागाने दिली आहे.

हेही वाचा – शीव पनवेल महामार्गावर रोडपाली खाडीपुलावर हाईटगेज

पावसाळा सुरू होताच साथीच्या आजाराची लागण होते. नवीन ईमारतीचे बांधकाम सुरू होते. तसेच बांधकामासाठी वापरले जाणारे पाणी अनेक दिवस साठवून ठेवल्यामुळे त्याठिकाणीदेखील या साथीच्या रोगांची उत्पत्ती होणाऱ्या डासांच्या अळ्या तयार होत असतात. जूनच्या तुलनेत जुलैमध्ये डेंग्यू, मलेरिया रुग्ण वाढले आहे. जूनमध्ये १२३६ रक्त तपासणी करण्यात आल्या होत्या, त्यामध्ये मलेरियाचे २ रुग्ण आढळे होते तर डेंग्यू सदृश्य ११५ रुग्ण होते. जुलैमध्ये १८९२१ रक्त तपासणी करून यामध्ये मलेरियाचे १५ तर डेंग्यू सदृश्य १८५ रुग्ण आढळले आहेत. तर आतापर्यंत २ डेंग्यू पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. महापालिकेकडून पुढील कालावधीत साथीचे रुग्ण आणखी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

शहरात १४८२ ठिकाणी डास उत्पत्ती

घराअंतर्गत डास उत्पत्ती स्थाने शोध मोहीम राबविण्यात आली असून या मोहिमेअंतर्गत जुलैमध्ये २२४०२९ घरांना भेटी देऊन ४१३८८८ घरांअंतर्गत डास उत्पत्ती स्थाने तपासण्यात आली. त्यामध्ये १४८२ स्थाने दूषित आढळून आली व ती नष्ट करण्यात आली. यामध्ये अ‍ॅनोफिलीस डास १६५ ठिकाणी तर १२२६ ठिकाणी एडिस आणि क्युलेक्सचे ९१ ठिकाणी, असे १४८२ ठिकाणी डास उत्पत्ती आढळली आहे.

महापालिका रुग्णालयात बाह्य रुग्ण २०० वाढले

यंदा कधी उन्ह कधी पावसाच्या वातावरणाने संसर्ग पसरविण्याऱ्या जंतूंना अधिक पोषकपूरक हवामान निर्मिती होत आहे. त्यामुळे रोग प्रसार करणाऱ्या जंतूंची प्रतिकार शक्ती वाढून त्यांची झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे हेवेमार्फत त्यांचे संसर्ग वाढले आहे. पालिका तसेच खाजगी रुग्णालयात तापाने बेजार झालेल्या रुग्णांची रीघ लागलेली पहावयास मिळत आहे. महापालिका वाशी रुग्णालयात बाह्य रुग्णांत वाढ झाली आहे. आधी ११०० पर्यंत असलेल्या रुग्णांत वाढ झाली असून आता १२००-१३०० बाह्य रुग्ण आहेत.

हेही वाचा – एपीएमसीत कोथिंबीर आवक वाढली, दर निम्म्यावर

सध्या हवामान बदलाने शहरात व्हायरल तापाची साथ आहे. सर्दी, खोकल्याचे रुग्णदेखील वाढले आहेत. महापालिका रुग्णालयात बाह्य रुग्णांत दोनशेनी वाढ झाली आहे. तसेच डेंग्यू, मलेरिया रुग्ण वाढले आहेत. मात्र महापालिकेकडून नियमितपणे धूर, औषधफवारणी आणि डास उत्पत्ती शोध मोहीम सुरू आहे. – डॉ. प्रशांत जवादे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी, नवी मुंबई महापालिका

संशयित डेंग्यू, मलेरिया रुग्ण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जानेवारी- १७, १
फेब्रुवारी- १०, ०
मार्च- १८, २
एप्रिल- ४६, ५
मे- ७७, २
जून- ११५, २
जुलै- १८५, १५