नवी मुंबई : नेरुळमधील डीपीएस फ्लेमिंगो तलावात भरतीच्यावेळी येणारे पाणी सिडकोनेच बनवलेल्या नेरुळ जेट्टीच्या कामामुळे अडवलेले गेले होते. त्यामुळे डीपीएस तलाव कोरडाठाक पडून या तलावात यंदाच्या मोसमात फ्लेमिंगो येणे बंद झाले होते. त्यामुळे याबाबत आमदार गणेश नाईक यांनी सिडको ,पालिका तसेच पर्यावरणप्रेमी यांच्यासमवेत या ठिकाणी पाहणीदौरा केला होता. तसेच भरतीचे तलावात येणारे पाणी खुले करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर या ठिकाणी पाईप टाकून तलावात पाणी येण्याचा मार्ग खुला करण्यात आला होता. त्यामुळे तलावात पाणी येऊन पुन्हा फ्लेमिंगोचे आगमन या तलावात झाले होते.

परंतू सिडकोने याबाबत एनआरआय पोलीस ठाण्यात लेखी तक्रार करुन पोलिसांनी चौकशी करुन योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे आता सिडकोच्या लेखी पत्रामुळे चांगलाच वाद निर्माण होणार असून आता गणेश नाईक काय पवित्रा घेणार याकडे लक्ष लागले आहे. तर या सिडकोच्या तक्रारीबाबत पर्यावरणप्रेमींनीही सिडकोच्या या पत्रप्रपंचाचा विरोधात संताप व्यक्त केला होता.

हेही वाचा…दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई विमानतळाला मिळण्यासाठी पुन्हा स्थानिकांकडून केंद्राकडे पाठपुरावा

सिडको आणि महापालिका ह्या दोन्ही राज्य सरकारच्या नगरविकास विभागांतर्गत येतात.सिडकोच्या वाशी येथील कार्यकारी अभियंत्याने स्वाक्षरी केलेल्या आणि किनारपट्टी पोलिसांच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना उद्देशून लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की आमदार गणेश नाईक यांनी २३ मे रोजी डीपीएस फ्लेमिंगो तलाव परिसराला भेट दिली होती आणि पालिका अधिकाऱ्यांना डीपीएस तलावात येणारे खाडीचे पाणी येण्यासाठी वाहिन्या उघडण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार पालिका कंत्राटदारांनी सुरुवातीचा ३०० मिमीचा व्यासाचा पाईप तोडून त्याऐवजी ६०० मिमीचा व्यासाचा पाइप टाकला आणि १० हॉर्सपॉवरच्या मोटरपंपाच्या साहाय्याने खाडीतून पाणीही काढले. पालिकेने हे काम सुरू करण्यापूर्वी सिडकोची परवानगी घेतली नाही.

सिडकोने आपल्या पत्रात दावा केला आहे की डीपीएस तलावाचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयाच्या विचाराधीन आहे . खाडीचे पाणी तलावात टाकल्याने खारफुटीची वाढ होऊ शकते ज्यामुळे सिडकोच्या परिसरात कोणताही विकास करण्याच्या योजनांवर परिणाम होऊ शकतो आणि मोठे आर्थिक नुकसानही होऊ शकते, अशी भीती सिडकोने व्यक्त केली. तसेच पालिकेच्या कामामुळे न्यायालयाचा अवमान होणार नाही याची काळजी घ्यावी तसेच महापालिकेच्या कामाला धक्का बसणार नाही, यासाठी योग्य ती कारवाई करावी, अशी विनंती पत्र सिडकोने पोलिसांना दिले आहे.याबाबत आमदार गणेश नाईक यांना संपर्क केला असता संपर्क झाला नाही.

हेही वाचा…फ्लेमिंगोला ड्रोनचा धोका तपासण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे गृह विभागाला निर्देश

उलटा चोर कोतवालको डाटे …

सिडकोला जमीन विकून विकास करायचा आहे. नेरुळ जेट्टी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रवासी जलवाहतूक टर्मिनलकडे जाण्यासाठी रस्ता तयार करताना तलावाकडे जाणारे भरतीचे पाणी अडवून सिडकोनेच चूक केली आहे. नेरुळ जेट्टीकडे जाणाऱ्या प्रवासी जलवाहतूक टर्मिनलकडे जाण्यासाठीचा रस्ता तयार करताना तलावाकडे जाणारे भरतीचे पाणी अडवून सिडकोनेच चूक केली आहे. सिडकोने जेट्टीचे काम सुरू करताना पाण्याच्या मुक्त प्रवाहात व्यत्यय आणणार नाही या आपल्याच उपक्रमाचे उल्लंघन केले आहे. केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने जेट्टीसाठी ४६ हेक्टर खारफुटी वळविण्याची परवानगी देताना, पाण्याच्या प्रवाहावर परिणाम होऊ नये, अशी तरतूद केली होती. त्या अटीचे सिडकोनेच पालन केले नाही. त्यामुळे सिडकोची भूमिका उलटा चोर कोतवाल को डाटे असा सिडकोचा प्रकार आहे. – बी.एन.कुमार, नॅटकनेक्ट फाउंडेशन

हेही वाचा…पनवेल : करंजाडे बसच्या फेऱ्या वाढवण्याची प्रवाशांची मागणी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

डीपीएस फ्लेमिंगो तलाव कोरडा पडला होता. त्यामुळे अन्न शोधत असताना तेथे उतरणारे फ्लेमिंगो विचलित झाले. या संकटामुळे जवळपास १० गुलाबी पक्ष्यांचा मृत्यू झाला. या तलावात आता पाणी येत असताना सिडको तक्रार करत आहे. सिडकोला वरवर पाहता पाणथळ जमिनीचे व्यावसायिक मालमत्तेत रूपांतर करायचे आहे .त्यामुळे सिडकोचा हा प्रयत्न असून आम्ही पर्यावरणाची हानी होऊ देणार नाही – संदीप सरीन, पर्यावरणप्रेमी