लोकसत्ता टीम

नवेल : पनवेल महापालिका आयुक्तांनी आदर्श आचारसंहितेचा भंग करु नका असे आवाहन नागरिकांसह राजकीय पक्षांना केले होते. मात्र तरीही आचारसंहितेचा भंग करुन पनवेल महापालिकेची परवानगी न घेता थेट फलकबाजी केल्यामुळे पालिकेने संबंधित शुभेच्छुक संदेश देणाऱ्यांविरोधात गुन्हा नोंदविला आहे. पालिकेच्या या धडक कारवाईमुळे पालिका प्रशासनाकडून फलकासाठी परवानगी न घेता थेट फलक लावणाऱ्यांना हा पालिकेचा इशारा आहे. 

police constable suspended for helping drug smuggler
अंमली पदार्थ तस्कराला मदत केल्याप्रकरणी पोलीस शिपायावर निलंबनाची कारवाई
इंडिया सत्तेत आल्यास ‘सीएए’ रद्द करणार! माकपच्या टीकेवर चिदम्बरम यांचा खुलासा
Nitesh Rane, T Raja
प्रक्षोभक भाषण प्रकरण : नितेश राणे, गीता जैन, टी. राजांविरोधात फौजदारी कारवाई करणार का ? उच्च न्यायालयाचा पोलीस आयुक्तांना प्रश्न
pm narendra modi rally in meerut
भ्रष्टाचाराविरुद्धचा लढा थांबणार नाही! मेरठच्या सभेत पंतप्रधानांचा इंडिया आघाडीला इशारा

आणखी वाचा- महापालिका अधिकाऱ्यांच्या अचानक बदलीमुळे पावसाळ्यापूर्वीच्या कामांना फटका

१७ मार्चला रात्री नऊ वाजता शीव पनवेल महामार्गावर कळंबोली येथील मॅकडोनाल्ड हॉटेलसमोरील पादचार पुलावर मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर वाढदिवसानिमित्त संबंधित फलकबाजी करण्यात आली आहे. हा फलक ५० फूट लांब आणि ८ फूट उंचीचा आहे. पालिकेच्या अधिका-यांनी पोलीसांत दिलेल्या तक्रारीमध्ये महाराष्ट्र मालमत्ता विदृपीकरण प्रतिबंध अधिनियम १९९५ चे कलम ३ सह महापालिका अधिनियम १९४९ चे कलम २४४, २४५ सह प्रतिक महापालिका (जाहिरात, फलक व नियंत्रण) नियम २००३ अन्वये ही कारवाई केल्याचे म्हटले आहे.