उरण : दिबांच्या नावाने सुरू करण्यात येणाऱ्या नाम फलक आणि संरक्षण भिंतीच्या कामाचे उदघाटन विजया दशमीच्या दिवशी करण्यात आलं. यावेळी माजी आमदार मनोहर भोईर,कॉ. भूषण पाटील,काशिनाथ गायकवाड,सुधाकर पाटील,जगदीश उरणकर,संतोष पवार आणि या संकुलाचे काम हाती घेणारे विजय शिरढोणकर,राजेंद्र शिरढोणकर तसेच संस्थेच अध्यक्ष दिनेश घरत आदीजण उपस्थित होते. २००८ पासून प्रस्तावित असलेल्या या दिबांच्या नावाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाची उभारणी होत आहे. उरण मध्ये निर्माण होणाऱ्या पहिल्या वहिल्या अभियांत्रिकी महाविद्यालयाला तब्बल १४ वर्षांनी सुरुवात होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. याची सुरुवात विजयादशमीच्या दिवशी होणार आहे.
त्यामुळे स्थानिक भूमिपुत्रांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.दिबांच्या हयातीत आयुष्यात प्रथमच एखाद्या संस्थेला नाव देण्यास मंजुरी त्यांनी दिली होती. ते उरणमध्ये दिबांच्या नावाने उभरण्यात येणाऱ्या अभियांत्रिकी महाविद्यालय गेल्या १४ वर्षांपासून राखलेले आहे. याकडे विविध पक्षांच्या नेत्यांचेही सातत्याने दुर्लक्ष झाले आहे. रायगड जिल्ह्यातील खेड्यापाड्यात विशेषतः उरण, पनवेल तालुक्यातील
माजी खासदार दि. बा. पाटील यांनी उभारलेल्या विद्यालयातून अनेक पिढया शिक्षण घेऊ शकल्या आहेत. मात्र दिबांच्या हयातीत त्यांच्या नावाने उरण मध्ये उभारण्यात येणार अभियांत्रिकी महाविद्यालय गेल्या १४ वर्षात स्वप्नातच राहिले आहे.
दुसरीकडे उठसूट दिबांच्या नावाने मतांचा जोगवा मागणाऱ्या विविध पक्षांच्या नेत्यांचेही दुर्लक्ष सुरू आहे. २००८ मध्ये उरणच्या सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येत सामाजिक ,शैक्षणिक कार्य करण्याच्या उद्देशाने उरण प्रकल्पग्रस्त सामाजिक शैक्षणिक संस्था स्थापन केली. या संस्थेच्या माध्यमातून हे अभियांत्रिकी महाविद्यालय उभारण्यात येणार आहे.
उरण मध्ये देशातील सर्वात जास्त व मोठं मोठे केंद्र व राज्य उद्योग असलेले ठिकाण आहे. तर नवी मुंबईच्या विकासाचा भाग असूनही गेल्या ५२ वर्षात एकही उच्च शिक्षण देणारे महाविद्यालय उभे राहू शकले नाही. त्यामुळे येथील विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी शिक्षणासाठी मुंबई, नवी मुंबई किंवा पनवेल गाठावे लागत आहे. आजची हीच स्थिती आहे. त्यामुळे या प्रकल्पग्रस्त संस्थेच्या माध्यमातून अभियांत्रिकी महाविद्यालय उभारण्याचा संकल्प करण्यात आला. या महाविद्यालयाला माजी खासदार दिबां पाटील यांचं नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला.
मात्र दिबांनी आपल्या हयातीत आशा प्रकारे महाविद्यालयाला आपलं नाव देण्यास विरोध केला. याचे उत्तम उदाहरण म्हणजे आजचे पनवेल येथील महात्मा फुले महाविद्यालय हे महाविद्यालय उभरण्यात त्यांचा सिहाचा वाटा होता. त्यामुळेच उरण, पनवेल,बेलापूर आणि कर्जत येथील विद्यार्थी आपले महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करू शकले. मात्र दिबांनी या महाविद्यालयाला महात्मा फुले यांचे नाव दिले. अभियांत्रिकी महाविद्यालयासाठी उरण मधील सर्वपक्षीय नेत्यांच्या मनधरणी नंतर त्यांनी उरणच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाला नाव देण्यास मान्यता देण्यात आली. त्यासाठी उरणच्या उरण पनवेल महामार्गा लगत सिडकोकडून भूखंड ही मिळविण्यात यश आलं.
मात्र गेल्या अनेक वर्षांपासून हे अभियांत्रिकी महाविद्यालय रखडले आहे. यासाठी उरण- पनवेल मधील सर्वसामान्य जनता आणि स्थानिक उद्योजकांनी आर्थिक सहकार्य केले. परंतु येथील अनेक बड्या उद्योगानी निधी देण्याकडे सातत्याने दुर्लक्ष केले आहे. काही महिन्यांपूर्वी जेएनपीएने निधी देऊ केला आहे. मात्र त्यातून महाविद्यालय उभारणे अशक्य आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर या दिबांच्या नावाच्या रखडलेल्या महाविद्यालयाची दखल राजकीय नेते दखल घेतील अशी अपेक्षा होती. मात्र तीही फोल ठरली आहे. यामुळे स्थानिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.
संस्थेला सिडको कडून मिळालेल्या भूखंडावर शैक्षणिक संकुल उभारणीसाठी नवा प्रस्ताव आला असून त्याची सुरुवात होणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष दिनेश घरत यांनी दिली आणि.