१४ वर्षांपासून उरणमध्ये मंजूर झालेल्या उपजिल्हा रुग्णालयाची उरणकरांना प्रतिक्षा आहे. सोमवारी जिल्हा शल्यचिकित्सक, सिडको, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी तसेच सामाजिक संस्थेच्या पदाधिकारी यांनी रुग्णालयाच्या भूखंडाची पाहणी केली. त्यामुळे पुन्हा एकदा उरणच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या अपेक्षा निर्माण झाल्या आहेत.

हेही वाचा- नवी मुंबई: नको असलेल्या वस्तू हवे असलेल्यांपर्यंत पोहचविणारी योजना बारगळली

उरणमधील वाढती वाहने व त्यामुळे होणारे अपघात, या अपघातात उपचाराविना जाणारे जीव. तसेच उरणमधील नागरिकांना उपचारासाठी मुंबई, नवी मुंबई व पनवेलची रुग्णालये गाठावी लागत होती. यातून उरणमध्येच येथील रुग्णांवर उपचार करण्यासाठी सुसज्ज रुग्णालय उभारण्याची मागणी करण्यात आली होती. याकरिता आंदोलन मोर्चे, उपोषण, आमरण उपोषण एवढेच नाही तर अखेर मुंबई उच्च न्यायालयात जनहीत याचीकाही दाखल करण्यात आली होती. एवढे करूनही उरणवासी हॉस्पिटल होईल या अपेक्षेने वाट पाहत आहेत. त्याबाबत पालकमंत्री उदय सामंत यांनी घेतलेल्या अलिबाग येथील जनता दरबारात उरण सामाजिक संस्थेच्यावतीने काॅ. भूषण पाटील, सरचिटणीस संतोष पवार यांनी लेखी तसेच तोंडी कैफीयत मांडली आणि केंद्र व राज्याचे अनेक अती संवेदनशील, अत्यंत ज्वालाग्राही पदार्थ हाताळणारे प्रकल्प त्याचप्रमाणे जेएनपीटी पोर्ट व त्यावर आधारित इतर पोर्ट यातून मिळणारा प्रचंड आर्थिक नफा आणि अद्ययावत सुविधा आरोग्य / तंत्रशिक्षण शुन्य याबाबत योग्य तो पाठपुरावा करून लवकरात लवकर १०० खाटाचे उप जिल्हा रुग्णालयाचे भूमिपूजन करण्याचा कार्यक्रम घेण्याचे सूतोवाच केले आहे. सोमवारी रुग्णालयाच्या मंजूर भूखंडाची ची पाहणी जिल्हा शल्य चिकित्सक. डॉ. सुहास माने आणि टीमने पहाणी केली आहे. त्यामुळे उरणकरांच्या हॉस्पिटल होण्याच्या आशा पून्हा जागृत झाल्या आहेत.

हेही वाचा- मोरा- मुंबई जलसेवा तीन तास बंद राहणार; बंदरातील गाळामुळे प्रवाशांचा खोळंबा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पालकमंत्री श्री उदय सामंत यांनी अलिबाग येथे दिलेल्या सूचनेप्रमाणे उरण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुधाकर पाटील, कार्याध्यक्ष काॅ. भूषण पाटील, सचिव संतोष पवार यांनी पालकमंत्री सामंत यांच्या आदेशानुसार उरणच्या प्रस्तावित रुग्णालयाच्या भूखंडाची पाहणी करण्यात आली. यावेळी उरण इंदिरा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. बाबासो काळेल, सहाय्यक अधिक्षक अनिल ठाकूर,नगरसेवक ठाकूर उरणमधील प्रस्तावित रुग्णालयासाठी सिडकोकडून मिळालेल्या भूखंडाची पाहणी सोमवारी करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने यांनी दिली.