scorecardresearch

१ कोटी ४१ लाखांचा भाजीपाला, फळे दुबईत विकून निर्यातदाराची फसवणूक; एजंट विरोधात गुन्हा दाखल

आरोपींना हा माल ज्यांनी मागवला त्यांना न देता परस्पर स्वतःच थेट ग्राहकांना विक्री केला

crime news
भाजीपाला, फळे दुबईत विकून निर्यातदाराची फसवणूक (संग्रहित छायाचित्र)

नेरूळ येथील एका निर्यात कंपनीच्या दुबई प्रतिनिधीने कंपनीच्या परस्पर माल विकून फसवणूक केल्याप्रकरणी नेरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रतिनिधींनी तब्बल १ कोटी ४१ लाख ७९३ रुपयांचे आंबे, फळभाजी, मिरची आदी परस्पर विक्री केली होती.

हेही वाचा- नवी मुंबई : इंदिरानगर येथे गॅस गळती, नागरिकांना श्वास घेण्यास त्रास

 नेरूळ येथे जय माता दि इंटरनँशनल हि निर्यात कंपनी असून या मार्फत  बांगलादेश, यु ए इ, श्रीलंका, व भारता शेजारील इतर देशात फल भाजीपाला मिरची लिंबू तसेच हापूस आंबे निर्यात केली जातात.  या व्यवहारातील पैसे थेट  बँक खात्यात वा प्रतिनिधी यांच्या मार्फत मिळतात.२०२० पासून नौकरीस असलेले कंपनी प्रतिनिधी  प्रसन्ना देशपांडे यांना दुबई येथे प्रतिनिधी म्हणून नेमले. देशपांडे  यांनी दुबई येथील आरुधी फूड, पटेल ब्रदर्स, आणि व्हर्सटाईल या कंपनी साठी हापूस आंबे, हिरवी मिरची व लिंबूची मागणी केली.याचे एकूण मूल्य १ कोटी ४१ लाख ७९३ एवढे झाले होते. याची ऑर्डर इ मेल द्वारे देण्यात आली तसेच फोनवर बोलणेही झालेले होते. २०२१ ते आज पर्यत हि मागणी पुरवण्यात आली. मात्र हे पैसे कंपनीत पोहचलेच नाहीत. याबाबत अनेकदा देशपांडे यांच्याशी पैशाबाबत चौकशी केली. मात्र समंधीत एजन्सीने पैसे न दिल्याने पैसे पाठउ शकत नाही असे उत्तर देशपांडे हे देत असल्याचे तक्रारदाराने नमूद केले आहे.

हेही वाचा- नवी मुंबई : माथाडी नेते शासनाच्या बैठकीच्या प्रतीक्षेत

या व्यवहाराबाबत संशय आल्याने कंपनी मालक देवधर पांडे हे स्वतः दुबई येथे जाऊन पूर्ण व्यवहाराची शहानिशा केली असता हा माल ज्यांनी मागवला त्यांना न देता परस्पर स्वतःच थेट ग्राहकांना विक्री केला गेला होता. तसेच त्याचे पैसे स्वतःकडे ठेऊन घेतले होते. त्यामुळे आपली फसगत झाल्याचे लक्षात आल्याने देशपांडे यांच्या विरोधात नेरूळ पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 22-02-2023 at 10:46 IST
ताज्या बातम्या