मंगळवारी अरबी समुद्राला मिळणाऱ्या नाल्यातून आलेल्या काळ्या पाण्यामुळे उरणचा पिरवाडी किनारा काळवंडून गेला होता. त्यामुळे या किनाऱ्यावर येणाऱ्या पर्यटकांनाही याचा फटका बसला आहे.

हेही वाचा- नवी मुंबई : कासाडी नदीत प्रदूषण करणाऱ्या त्या कंपनीवर अखेर कारवाई

An advertisement board fell down in Wagholi due to strong winds Pune news
सोसाट्याचा वाऱ्यामुळे वाघोलीत कोसळला जाहिरात फलक
24 tree fall due to unseasonal rain in pimpri chinchwad
पिंपरी : अवकाळी पावसाची हजेरी, वादळी वाऱ्यामुळे २४ ठिकाणी झाडपडीच्या घटना
Barfiwala bridge
मुंबई : बर्फीवाला पुलाचा ‘पार्किंग’साठी वापर, क्रिकेट खेळण्यासाठी, कपडे वाळत घालण्यासाठी उपयोग
Stop on black market of water action will be taken against those who demand money for tankers
पाण्याच्या काळ्या बाजाराला बांध, टँकरसाठी पैसे मागणाऱ्यांवर कारवाई होणार

उरण, पनवेल तसेच नवी मुंबईतील आणि रायगड जिल्ह्यातील पर्यटकांसाठी एक दिवसीय पर्यटन स्थळ म्हणून पिरवाडी किनारा प्रसिद्ध आहे. त्याचप्रमाणे उरणमधील स्थानिक नागरीक व तरुण या किनाऱ्यावर येतात. सुट्टीच्या दिवशी तर शेकडो पर्यटकांची गर्दी आनंद लुटण्यासाठी या किनाऱ्यावर येते असते. त्यामुळे या किनाऱ्यावर सध्या विविध प्रकारचे करमणुकीचे साहित्य ही उपलब्ध आहे. तर दुसरीकडे खवय्यांना या किनाऱ्यावर आपली भूक भागविता येते. त्यासाठी खास करून गावठी पद्धतीचे व स्थानिक सी फूड ही उपलब्ध आहे. पिरवाडी किनाऱ्यावरील वाढत्या पर्यटनामुळे येथील स्थानिकांनाही काही प्रमाणात रोजगार उपलब्ध झाला आहे.

हेही वाचा- सानपाडा रेल्वे स्टेशन बाहेर त्याने स्वतःला पेटवून घेतले

मागील अनेक वर्षांपासून पिरवाडी किनाऱ्याची समुद्राच्या भरतीच्या लाटांमुळे मोठ्या प्रमाणात धूप होत होती. परिणामी किनाऱ्यावरील शेकडो वर्षांची नारळी, फोफळीची झाडे उन्मळून पडली पडत होती. ही किनाऱ्याची धूप थांबविण्यासाठी दगडी बंधारा तयार करण्यात आला आहे. त्यामुळे धूप थांबली आहे. मात्र नाल्यावाटे येणारे दुषित पाणी, तेलजन्य पदार्थ यामुळे पिरवाडी किनारा काळवंडण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. आशा घटनांमुळे स्थानिक नागरिकांकडून ही नाराजी व्यक्त केली जात आहे.