उरण: स्वच्छ भारत अभियानाचे उरण मध्ये तीनतेरा वाजवले असून तालुक्यातील रहदारीच्या रस्त्यांवर टाकण्यात येणारा कचरा आता कचरा माफियांनी हिरव्यागार निसर्गरम्य जंगलात टाकण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे चिरनेर परिसरातील जंगले डम्पिंग ग्राऊंड बनू लागली आहेत. यामुळे येथील पाड्यावर राहणाऱ्या आदिवासीच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

ग्रामपंचायतींनी रस्त्यांचे डंपिंग ग्राउंड केल्याचे चित्र उरण तालुक्यात निर्माण झाले आहे. अशा कचऱ्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. मात्र रस्त्यावरील जागा कमी पडू लागल्याने निसर्गाच्या सानिध्यात प्रदूषणापासून मुक्त असलेल्या आदिवासी परीसरातील जंगलात प्रदूषण निर्माण करणाऱ्या कचऱ्याचे ढीग उभे राहू लागले आहेत.

हेही वाचा… पनवेलला डेंग्यू, मलेरियाचा फास; जेमतेम दीड महिन्यात डेंग्यूचे १४८ तर मलेरियाचे ७९ रुग्ण

अरबी समुद्राच्या कुशीत वसलेला व निसर्ग संपन्न डोंगर रांगांच्या गर्द हिरव्या छायेत बसलेला उरण हा मुंबई व नवीमुंबई शहरांचा श्वास म्हणून ओळखला जाणारा तालुका आहे. मात्र या तालुक्यात असणाऱ्या ग्रामपंचायतींच्या हद्दीतील कचरा रहदारीच्या रस्त्यांवर टाकला जात आहे. त्यामुळे रस्त्यावरून ये जा करणाऱ्या जनतेचा श्वास कोंडला गेला असुन नाक मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. सध्या मोठया प्रमाणात केर कचरा हा चिरनेर-कोप्रोली, चिर्ले – दिघोडे,पिरवाडी- चारफाटा, द्रोणागिरी नोड तसेच तालुक्यातील इतर रस्त्यावर टाकला जात आहे. त्यामुळे कुजलेल्या कचऱ्यामुळे दुर्गंधी पसरत आहे. त्यामुळे या दुर्गंधीने साथीचे रोग पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे.

हेही वाचा… बैठ्या घरांच्या पुनर्बांधणीचा मार्ग मोकळा? पार्किंगची अट काढावी यासाठी महापालिकेची पुनर्विचार याचिका

एकंदरीत शासन स्वच्छतेकडे लक्ष केंद्रित करत असताना गावातील ग्रामपंचायत प्रशासन स्वच्छतेकडे दुर्लक्ष करीत असून जनतेच्या आरोग्याशी खेळत आहे. तसेच ग्रामस्वच्छतेसाठी आग्रही असणारे महसूल विभाग, पंचायत समिती प्रशासन सुद्धा ग्रामपंचायतींच्या या अस्वच्छ कारभाराला प्रतिबंध करीत नसल्याने संताप व्यक्त होत आहे. चिरनेर-कोप्रोली,चिर्ले – दिघोडे, पिरवाडी- चारफाटा, द्रोणागिरी नोड रस्त्यावरुन दररोज हजारो लोकांची मोठ्या प्रमाणात ये जा सुरू असते. उन्हाळ्यात काही प्रमाणात कचरा जाळला जात होता त्यामुळे दुर्गंधी नव्हती परंतु पावसामध्ये रस्त्यावर टाकलेल्या कचरा कुजून दुर्गंधी येऊ लागली असल्याची माहिती चिरनेर येथील सामाजिक कार्यकर्ते अनंत नारंगीकर यांनी दिली.

हेही वाचा… रिक्षात विसरलेला दिड लाखांचा व्हिडीओ कॅमेरा व किट परत मूळ मालकाकडे; सीसीटीव्हीमुळे झाले शक्य 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उरण तालुक्यातील डम्पिंग ग्राउंड नाही. याकरिता उरण तहसीलदार, सिडको तसेच संबंधित प्रशासकीय अधिकारी यांच्या सोबत बैठक घेणार असल्याची माहिती उरण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी एस.पी.वाठारकर यांनी दिली आहे.