लोकसत्ता टीम

पनवेल: पनवेल महापालिकेच्या शाळेंमधील विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाविषयी सजगता असावी यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. मंगळवारी पालिकेच्या लोकनेते दि.बा. पाटील विद्यालयामध्ये माझी वसुंधरा 4.0 अंतर्गत ‘जागतिक मृदा दिन’ साजरा करण्यात आला.

यावेळी महानगरपालिकेचे पर्यावरण विभाग प्रमुख मनोज चव्हाण, शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी किर्ती महाजन, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका अनुपमा डामरे आणि शिक्षकवर्ग उपस्थित होते.

आणखी वाचा-नवी मुंबईत सोनसाखळी चोरांची दहशत वाढतेय

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पनवेल महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल महानगरपालिका क्षेत्रात पर्यावरणाविषयी नागरिकांमध्ये जागरुकता वाढावी यासाठी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. मंगळवारी ‘माझी वसुंधरा 4.0’ अभियान याच कार्यक्रमाचा एक भाग होता. पर्यावरण विभाग उपायुक्त डॉ. वैभव विधाते यांच्या सूचनेप्रमाणे लोकनेते दि.बा पाटील विद्यालयामध्ये पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांना जागतिक मृदा दिनी मातीचे महत्व, वसुंधरेचे महत्व सांगण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांनी प्लॅस्टिक उपवास पाळावा आणि पर्यावरणीय बदल याबाबत माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांनी त्यांच्या जवळच्या मोकळ्या जागेत एक तरी झाड दत्तक घ्यावे व त्याची जोपासना करावी याविषयी आवाहन केले. यामुळे विद्यार्थी हेच पर्यावरणाचे दूत बनतील असा पालिकेचा उद्देश आहे.