माजी आमदार मंगेश सांगळे यांच्या विरोधात नवी मुंबईतील रबाळे पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर सांगळे हे बेपत्ता असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मंगेश सांगळे हे मनसेच्या तिकिटावर विक्रोळीतून आमदार म्हणून निवडून आले होते. २०१४ मधील निवडणुकीत पराभव झाल्यानंतर त्यांनी मनसेमधून भाजपात प्रवेश केला होता. ऐरोलीत राहणारे एक कुटुंब मंगेळ सांगळे यांच्या परिचयाचे आहे. या कुटुंबातील १९ वर्षांच्या तरुणीने मंगेश सांगळे यांच्यावर विनयभंगाचा आरोप केला आहे.

मंगेश सांगळे यांनी कारमध्ये तरुणीसोबत असभ्य वर्तन केल्याचा आरोप आहे. मंगेश सांगळे यांनी जवळीक साधण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप पीडित तरुणीने केला आहे. मी मंगेश सांगळे यांना घरी सोडा अन्यथा आरडाओरडा करु, अशी धमकी दिल्यानंतर मंगेश सांगळे यांनी मला घरी सोडले, असे पीडितेने तक्रारीत म्हटले आहे. ऑक्टोबर २०१८ मध्ये ही घटना घडली होती. याच महिन्यात तरुणीची सहामाही परीक्षाही होती. सांगळेसोबतचे कौटुंबिक संबंध पाहता पीडितेने सुरुवातीला आई-वडिलांना याबाबत माहिती दिली नाही. मात्र, पालकांना ही बाब लक्षात येताच त्यांनी मुलीशी संवाद साधला आणि तिला बोलते केले. मुलीने माहिती देताच त्यांनी रबाळे पोलीस ठाणे गाठत गुन्हा दाखल केला. सध्या सांगळे बेपत्ता असून त्यांचा शोध पोलीस घेत आहेत, अशी माहिती परिमंडळ एकचे उपायुक्त डॉ सुधाकर पाठारे यांनी  दिली. या प्रकरणी मंगेश सांगळे यांच्या वतीने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Former mla mangesh sangle booked in molestation case rabale police station
First published on: 17-03-2019 at 18:43 IST