इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान अंतिम सामना नुकताच झाला या सामान्या वेळी बेटिंग करणाऱ्या चार जणांवर नवी मुंबई पोलिसांनी कारवाई केली आहे. त्यांच्याकडून सट्टा खेळवण्यासाठी लागणारे सात लाखांचे इलेक्ट्रॉनिक साहित्य जप्त करण्यात आले आहे. सदर कारवाई काल (रविवारी) रात्री अकाराच्या सुमारास करण्यात आली.

हेही वाचा- नवी मुंबई: सिगारेटचे थोतुक पायावर पडल्याच्या क्षुल्लक कारणाने एकाची हत्या; दोन अत्यवस्थ
 
नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रातील खारघर येथील  केसर बिल्डिंग सदनिका क्रमांक ७०२  या ठिकाणी काही इसम टी २०  क्रिकेट वर्ल्ड कप मधील इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील फायनल स्पर्धेवर बेकायदेशीर पैश्यांचा जुगार खेळत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी यांना मिळाली होती त्यांनी पथकासह या ठिकाणी धाड टाकून चार जणांना अटक केली आहे.

हेही वाचा- नवी मुंबईतून भेसळयुक्त हळद आणि मसाल्यांचा २७ लाख रुपयांचा साठा जप्त

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

 निलेश राजकुमार रामरखयानी ,सुनिल राजकुमार मखिजा ,  सतिश गोविंद लोखंडे  जयकुमार तिरथदास कुकरेजा असे यातील अटक आरोपींची नावे आहेत यातील सतीश व्यतरिक्त सर्व पिंपरी चिंचवड परिसरातील रहिवासी आहेत यांनी यांनी आपापसात संगणमत करुन लोकांची फसवणूक करण्याचे उद्देशाने व स्वत:च्या आर्थिक फायद्याकरिता  http://goldenexch99.in व http://lotusbook247.com या वेबसाईटवर व SHUBHLABH, LEDGER BOOK व Taj777.ink या अप्लीकेशनचा मोबाईल फोन, लॅपटॉपचे माध्यमातून जुगार खेळण्याकरिता वापर करुन क्रिकेट मॅचच्या हारजीतवर मोबाईल द्वारे व लॅपटॉपचे माध्यमातून सट्टा लावताना व घेताना (बेटींग हा जुगार खेळत व खेळवत असताना) आढळून आले.
आरोपींच्या कडून गुन्ह्यात वापरलेले २२  मोबाइल फोन त्यात २  लॅपटॉप वायफाय राउटर असा एकूण ७ लाख ४५ हजार ३०० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे