उरण : येथील पाणजे व डोंगरी गावाच्या शेजारी असलेल्या पाणथळ परिसरात रविवारी सकाळी दोन कोल्हे जोडीने विहार करतांना दिसून आले आहेत. उरणच्या कांदळवन व खाडी परिसरात काही प्रमाणात आहेत. मात्र रविवारी सकाळी या भागात मासेमारी साठी गेलेल्या स्थानिक मच्छिमारांना प्रथम ते दिसले त्यानंतर त्यांनी येथील पर्यावरणवादी कार्यकर्त्याला याची माहिती दिली. उरण आणि जेएनपीटी बंदराच्या परिसरात सुरू असलेल्या औद्योगिकीकरणामुळे उरण मध्ये कोल्हे दिसेनासे झाले होते.
डोंगरी गावातील मच्छिमार या परिसरात मासेमारीसाठी गेले असता त्यांना हे प्रथम कोल्हे दिसले त्यांनी मला माहिती दिली त्यानंतर मी त्यांचा शोध घेतला असता त्यांची पिल्ले शेजारील गवतात असावीत अशी माहिती डोंगरी गावातील पर्यावरणवादी कार्यकर्ता पराग घरत यांनी दिली.