गृहिणींना दिलासा; लसूण झाले स्वस्त, घाऊक बाजारात प्रतिकिलो १५ ते २० रुपयांची घसरण

घाऊक बाजारात लसणाचे दर ८० ते ११० रुपयांवरून आता ५० ते ८५ रुपयांवर आले आहेत.

Garlic rate Garlic cheaper
लसूण झाले स्वस्त, घाऊक बाजारात प्रतिकिलो १५ ते २० रुपयांची घसरण (image – pixabay)

नवी मुंबई : वाशी एपीएमसी बाजारात जानेवारी-फेब्रुवारीपासून नवीन लसणाची आवक होण्यास सुरुवात होते. बाजारात आता पूर्णपणे नवीन लसूण दाखल होत आहे. नवीन लसणाची आवक वाढली असल्याने लसणाचे दर उतरले आहेत. घाऊक बाजारात दर ८० ते ११० रुपयांवरून आता ५० ते ८५ रुपयांवर आले आहेत.

तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
Skip
तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
7 व्या लेखांपैकी हा 3 वा लेख आहे ज्यापूर्वी तुम्हाला नोंदणी करावी लागेल
आमच्या विनामूल्य लेखांमध्ये अमर्यादित प्रवेशासाठी, कृपया साइटवर लॉग इन करा
Skip

हेही वाचा – नवी मुंबई : एल अ‍ॅण्ड टी कंपनीचे सीवूड्स येथील पदपथाचे काम पुन्हा सुरू

हेही वाचा – शीव-पनवेल मार्गावर मार्गिका पट्टे नसल्याने छोट्या अपघातात वाढ 

एपीएमसी बाजारात जानेवारी-फेब्रुवारीमध्ये नवीन लसणाची आवक जादा आहे. त्यामुळे नवीन लसूण बाजारात दाखल होताच दर आवाक्यात येत असतात. चार वर्षांपूर्वी लसणाचे दर गगनाला भिडले होते. प्रतिकिलो २०० ते २५० रुपयांची मजल मारली होती. एपीएमसीत मध्यप्रदेश आणि गुजरातमधून लसणाची आवक होते. सध्या मध्यप्रदेश येथील १४ गाड्या लसूण दाखल होत आहे. यामध्ये दोन प्रकारच्या लसणाचा समावेश आहे. एक देशी लसूण आणि दुसरा उटी लसूण. यामध्ये उटी अधिक दराने विक्री होत असून प्रतिकिलो ४०-८५, तर देशी लसूण ३०-५० रुपयांनी विक्री होत आहे. नवीन लसूण दाखल होत असून आवक चांगली होत असल्याने दरात घसरण झाल्याचे मत घाऊक व्यापाऱ्यांनी व्यक्त केले आहे.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 25-03-2023 at 15:44 IST
Next Story
शीव-पनवेल मार्गावर मार्गिका पट्टे नसल्याने छोट्या अपघातात वाढ 
Exit mobile version