पुणे : शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने सनदी लेखापालाची तीन कोटी तीन लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा देण्याचे आमिष चोरट्यांनी सनदी लेखापालाला दाखविले होते. चोरट्यांच्या आमिषाला बळी पडलेल्या सनदी लेखापालाने गुंतवणुकीसाठी एका बँकेकडून दोन कोटी रुपयांचे कर्ज काढले होते.

याबाबत एका ४९ वर्षीय सनदी लेखापालाने सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार सनदी लेखापाल एका खासगी कंपनीत कामाला आहेत. फेब्रुवारी महिन्यात सनदी लेखापालाला सायबर चोरट्यांनी संदेश पाठविला होता. ऑनलाइन पद्धतीने शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष चोरट्यांनी त्यांना दाखविले होते.

drugged woman high voltage drama caught on camera strips naked demands sex at jamaica airport video viral
नग्नावस्थेत महिलेचा विमानतळावर धिंगाणा! नशेत तिच्याकडून शरीरसंबंधाची मागणी; VIDEO व्हायरल
What Poonam Mahajan Said?
भाजपाने तिकिट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “मी…”
mumbai cyber fraud 25 crore
मुंबईतील सर्वात मोठा सायबर स्कॅम; महिलेची २५ कोटींची फसवणूक, चोरांची ट्रीक अशी होती
uddhav thackeray amit shah latest news
Maharashtra News : “अमित शाहांना एवढंच सांगायचंय की तुमच्या पुत्रप्रेमामुळे भारत…”, उद्धव ठाकरेंचा ‘त्या’ विधानावरून टोला!

हेही वाचा : ऐतिहासिक कात्रज तलाव एप्रिलमध्येच रिकामा कसा झाला?

शेअर बाजारातील गुंतवणुकीबाबत मार्गदर्शन करण्यात येईल, असे सांगून चोरट्यांनी त्यांना एक ॲप डाऊनलोड करण्यास सांगितले होते. चोरट्यांच्या आमिषाला बळी पडलेल्या सनदी लेखापालाने दोन बँकांकडून दोन कोटी रुपयांचे कर्ज काढले होते. गुंतवणूक केल्यानंतर सनदी लेखापालाला ॲपवर मिळालेल्या परताव्याची माहिती दिसत होती. त्यानंतर त्यांनी शेअर बाजारातून पैसे काढण्याबाबत चोरट्यांनी दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधून विचारणा केली. तेव्हा चांगला परतावा मिळाला असून, काही रक्कम सामाजिक कार्यासाठी द्यावी लागेल, असे चोरट्यांनी सांगितले. परतावा न दिल्याने सनदी लेखापालाला संशय आला. त्यानंतर त्यांनी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला. याप्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.