पनवेल – सोनसाखळी चोरट्याने सोमवारी सायंकाळी सात वाजता ५२ वर्षीय पादचारी महिलेच्या चेह-यावर दगडाने हल्ला करुन त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून तेथून पसार झाला. ही घटना नवीन पनवेल उपनगरात सेक्टर १२ येथील रस्ता क्रमांक १ येथे घडली. चोरट्याने महिलेचे गळ्यातील ८३ हजार रुपयांची सोनसाखळी चोरी केल्याची नोंद खांदेश्वर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. सोनसाखळी चोरट्यांना पकडण्यात नवी मुंबई पोलीस अपयशी ठरत असल्याने चोरट्यांची दहशत वाढत चालल्याचे चित्र परिसरात आहे. 

नवीन पनवेल उपनगरातील सेक्टर १३ मध्ये राहणा-या नोकरदार महिला नारळ पाणी खरेदी करण्यासाठी सोमवारी सेक्टर १२ येथील रस्त्यावरुन पायी चालत होत्या. अचानक त्या महिलेच्या पाठीमागून आलेल्या २२ वर्षीय तरुणाने महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावली. मात्र महिलेने गळ्यातील सोनसाखळी पकडून ठेवल्याने चोरट्याने जवळचा दगड उचलून त्या महिलेच्या चेह-यावर दगडाने हल्ला केला. महिलेच्या चेह-यावर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दगड लागल्याने त्यांनी सोनसाखळीवरील हात सोडून जखमेवर ठेवला. तोपर्यंत चोरट्याने महिलेच्या गळ्यातील ३२ ग्रॅम वजनाची सोनसाखळी हिसकावून तेथून पळून गेला. या घटनेमुळे महिलांच्या सूरक्षेचा प्रश्न एेरवणीवर आला आहे. खांदेश्वरसह नवीन पनवेल उपनगर या परिसराच्या पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदाची जबाबदारी स्मीता ढाकणे या महिला पोलीस अधिका-यांकडेच पोलीस आयुक्तांनी सोपवली आहे. पोलीसांची गस्त या परिसरात वाढवण्याची मागणी रहिवाशांकडून होत आहे.