देश व राज्याचा अर्थसंकल्प नूकताच मांडला जाणार असून राज्य शासनाने अर्थसंकल्पातील सर्वाधिक मोठी आर्थिक तरतुद आरोग्य व शिक्षणावर करावी अशी मागणी राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जाहीर कार्यक्रमात केली. खारघर येथील सेक्टर १० मधील भारती विद्यापीठ आणि मेडीकव्हर रुग्णालयाच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- ‘जीएसटीचे किचकट नियम बदला, इन्स्पेक्टर राज बंद करा अन्यथा देशव्यापी उग्र आंदोलन’; भारतीय उद्योग व्यापारी मंडळाचा इशारा

खासगी रुग्णालयातील वैद्यकीय सेवा न परवडणारी असल्याने सामान्यांना परवडणारी वैद्यकीय सेवा मिळावी यासाठी केंद्र व राज्य शासनाने प्रयत्न करावेत अशी मनिषा माजी मुख्यमंत्री चव्हाण यांनी व्यक्त केली. खासगी रुग्णालयाच्या उदघाटन सोहळ्यातील समारंभाच्या व्यासपीठावर राज्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनीही चव्हाण यांच्या मागणीचा दुजोरा देत केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेतील पाच लाख आणि राज्य सरकारच्या महात्मा फुले जनआरोग्य योजनेत दोन लाख रुपयांचा वैद्यकीय विम्याची क्षमता वाढविण्याचे संकेत यावेळी दिले.

हेही वाचा- भाताचे कोठार म्हणून ओळख असेलला उरण तालुका भूमिहीन होणार; एमआयडीसीसाठी उरणमधील तीन गावांचे संपादन

पनवेल शीव महामार्गावरील खारघर वसाहतीमधील सेक्टर १० येथील भव्य भूखंडावर भारती विद्यापीठ समुहाने युरोपच्या मेडीकव्हर समुहाशी भागीदारी करत भव्य मल्टीस्पेशालीटी रुग्णालय सूरु केले. माजी मुख्यमंत्री चव्हाण यांनी भारती विद्यापीठ समुहाचे कौतुक करताना मेडीकव्हर समुहासोबत केलेल्या भागीदारीमुळे युरोप खंडातील वैद्यकीय सरावाची शिस्तबद्धता राज्यातील रुग्णांना अनुभवता येईल असे यावेळी सांगीतले. तसेच देशात डॉक्टरांची कमतरता आणि मोठ्या रुग्ण संख्येमुळे सरकारी वैद्यकीय व्यवस्था तोकडी पडत असल्याकडे माजी मुख्यमंत्री चव्हाण यांनी लक्षवेधले. त्यामुळे देशात वैद्यकीय सेवेत शॉर्टकर्ट मारले जात असून युरोपीयन देशातील वैद्यकीय सेवेतील शिस्तीची सवय देशातील इतर वैद्यकीय सेवा पुरविणा-यांना लागेल असा विश्वास यावेळी व्यक्त केला. पृथ्वीराज चव्हाण यांनी देश व राज्यातील अर्थसंकल्प नूकताच मांडला जाणार असून यामध्ये मोठ्या प्रमाणात आरोग्य आणि शिक्षणावर शासकीय खर्च करण्याची गरज असल्याची विनंती यावेळी खासगी रुग्णालयाच्या उदघाटन प्रसंगी केली.

हेही वाचा- उरण : चिरनेरमध्ये मोकाट गुरे व माकडाचा उच्छाद; वाल, हरभरा आदी कडधान्याची पिके केली फस्त

देशात एकूण खर्चापैकी जेमतेम २५ पैसे खर्च शासकीय उपचारांवर सामान्य रुग्णांवर खर्च केला जातो. मात्र ७५ टक्के खर्च रुग्णांना न परवडणारा खर्च करावा लागत असल्याची खंत मांडत इतर देशांमध्ये १०० टक्के किंवा त्याखालोखाल ८० टक्यांपर्यंत खर्च शासकीय खर्चातून राष्ट्रीय आरोग्य व वैद्यकीय उपचारांसाठी केला जात असल्याकडे त्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधले. केंद्र व राज्य सरकारांनी आरोग्य व शिक्षणासाठी शासकीय खर्चाचे प्रमाण वाढणे गरजेचे असल्याचे सांगत १९६४ साली देशाच्या एकुण उत्पन्नाच्या जीडीपीवर ६ टक्के खर्च करु असा पण केला होता, मात्र अजूनही शिक्षणावर ३ ते साडेतीन टक्के आणि आरोग्यावर दोन टक्यांवर अनेक सरकारांकडून खर्च केला नसल्याची खंत यावेळी व्यक्त केली. यावेळी मेडीकव्हर समुहाचे अनिल कृष्णा, फेड्रीरीक, स्विडनच्या जनरल नेकपॉल एना मारीया, खासदार सूनील तटकरे, सिडको महामंडळाचे एमडी डॉ. संजय मुखर्जी, कैलास शिंदे, भारती विद्यापीठाचे विश्वजीत कदम, शिवाजीराव कदम, आ. प्रशांत ठाकूर, निरंजन डावखरे हे उपस्थित होते. या रुग्णालयात पनवेलच्या गोरगरीबांना माफक दरात उपचार मिळतील असे रुग्णालय उदघाटन प्रसंगी विश्वजीत कदम आणि शिवाजीराव कदम यांनी व्यासपिठावर आश्वासित केले.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Government spending money on health and education is necessary said prithviraj chavans dpj
First published on: 23-01-2023 at 16:13 IST