पनवेल : कळंबोली येथे नवी मुंबई पोलिसांनी शनिवारी आयोजित केलेल्या रक्तदान शिबीराला नागरीकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. दोन दिवस सूरु असणा-या शिबीरासाठी विविध जाती धर्माचे नागरिक विविध वेशभूषेत एकत्र आले होते. विविधतेमध्ये एकता असा राष्ट्रीय संदेश यावेळी नागरिकांनी यावेळी दिला. नवी मुंबई पोलीस आयुक्त व उपायुक्तांना या विविध वेशभूषेच्या पेहरावाचा छायाचित्र काढण्याचा मोह यावेळी आवरता आला नाही, असे येथील चित्र होते. कळंबोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक संजय पाटील यांच्या संकल्पनेतून हे शिबीर आयोजित करण्यात आले होते.

एका पोलीस निरिक्षकाला कर्करोग झाल्याने कळंबोलीचे पोलीस अधिकारी पाटील हे त्यांची प्रकृती पाहण्यासाठी खारघर येथील टाटा कॅन्सर रुग्णालयात गेल्यावर तेथील डॉक्टरांशी चर्चा केल्यावर राज्यात व देशात रक्ताच्या बाटल्यांचा तुटवडा असल्याची समस्या त्यांना जाणवली. याच समस्येवर मात करण्यासाठी भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्याचे पोलीस अधिकारी पाटील व त्यांच्या सहका-यांनी ठरविले. गेली दोन आठवडे पोलीस ठाण्यात प्रत्येक पोलीसाला रक्तदान शिबीराचे यशस्वी आयोजनासाठी खास कामगीरी सोपविण्यात आली आहे. नेहमी कळंबोली पोलीस ठाण्यात गुन्हेगार व इतर चो-यांची चर्चा असते मात्र गेली दोन आठवडे ठाण्यातील कर्मचारी दिवसरात्र रक्तदान व त्या विषयीच्या माहिती नागरिकांपर्यंत पोहचविण्याचे काम करत आहेत.

wildlife lovers, Tigers, forest, cages,
‘वाघ जंगलात नको, पिंजऱ्यात हवेत का?’ वन्यजीवप्रेमींचा सवाल; प्रकरण काय? जाणून घ्या…
port at vadhvan, vadhvan,
वाढवण येथील पर्यावरणस्नेही बंदराचा मार्ग मोकळा
A proposal that Chhagan Bhujbal should contest elections from Nashik from BJP
‘कमळ’वर लढण्याचा भुजबळ यांना प्रस्ताव? ओबीसी मतपेढीसाठी भाजप पक्षश्रेष्ठींची खेळी
will Andheri Subway under water this year too work of widening of Mogra drain will be done next year
‘अंधेरी सबवे’ यंदाही पाण्याखाली? मोगरा नाल्याच्या रुंदीकरणाचे काम पुढच्या वर्षीच

हेही वाचा : देवीच्या यात्रेला गेल्याची संधी साधून चोरट्यांनी केली घरफोडी

नागरिकांच्या सहकार्याशिवाय रक्तदान यशस्वी होणार नसल्याने कळंबोलीकरांना एकत्र आणण्यासाठी दहीहंडी उत्सव साजरा करणाऱ्या पासून ते गणेशोत्सव मंडळ आणि नवरात्रोत्सव मंडळ, शाळांचे व्यवस्थापन तसेच विविध चर्चचे धर्मगुरु, मंदीरांचे व्यवस्थापक, मशीदींचे मौल्लाना, शांतता कमिटीचे सदस्य, व्यापारी बांधव अशांना एकत्र करुन रक्तदानासाठी विविध बैठका पोलीसांनी करुन त्यामध्ये रक्तदानाचे आवाहन करण्यात आले. शनिवार व रविवारी (8 व 9 अॉक्टोबर) रक्तदान मोठ्या प्रमाणात होईल असे नागरिकांच्या बैठकीत समोर आल्यावर नवरात्रोत्सवा नंतर सुधागड विद्यालयाच्या प्रांगणात हे शिबीर आयोजित केले.

हेही वाचा : लोकलवर बाटली फेकून मारणाऱ्याचा शोध सुरूच

या शिबीरात जमा झालेले रक्त मुंबई येथील के.ई. एम, जे.जे आणि टाटा रुग्णालयांना दिले जाणार आहे. एकाच वेळी 50 दाते रक्त देऊ शकतील अशी सोय रक्तपेढ्यांच्या विविध संस्थांनी सुधागड विद्यालयाच्या सभागृहात केली आहे. सुधाग़ड विद्यालयाच्या आर. एस. पी.च्या (रस्ता सुरक्षा दल ) लेझीम पथकाने नवी मुंबई पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंह व उपायुक्त शिवराज पाटील यांचे स्वागत केले. आगरी कोळी बांधवांनी त्यांच्या पारंपारीक वेशभूषेत व बॅण्डपथकात शिबीरात प्रवेश केला. मारवाडी समाजाचे बांधव पगडी घालून तर कळंबोलीतील युवांनी ढोलताशांच्या गजरात शिबीरात प्रवेश करुन सर्वांचे लक्ष वेधले. या शिबीरात सूमारे 1500 रक्त बाटल्या जमा करण्याचा मानस पोलीसांनी व्यक्त केला आहे.