नवी मुंबई : वाशी येथे एका मालवाहू रिक्षाचा विचित्र अपघात शनिवारी दुपारी चारच्या सुमारास झाला. सुदैवाने यात फारसे नुकसान झाले नाही मात्र या अपघाताने रस्त्यातील खांबांवर झाडांवर लोंबकणारे केबल्सचे वेटोळे किती धोकादायक होऊ शकतात हे समोर आले.नवी मुंबईतील रस्त्यावरील विजेचे खांबे आणि रस्त्यालगत असलेल्या झाडांवर विविध केबल्सचे वेटोळे दिसून येतात. राज्यातील क्रमांक एकचे व देशातील क्रमांक तीनचे स्वच्छ शहर म्हणून नावाजलेल्या नवी मुंबईत हे केबल्सचे बेंगरुळ दृश्य दिसते. वाशी कोपरी गावातून कोपरखैरणेच्या सीमेवर असणाऱ्या ब्ल्यू डायमंड चौकातुन वाशी कडे वळण घेऊन जात असताना अशाच वेटोळ्यात एका मालवाहू रिक्षातील फरशीच्या उभ्या ठेवलेल्या पट्ट्या अडकल्या व क्षणात रिक्षा थेट झाडावर चढली.

हेही वाचा : वाशीत १६ लाखांची चोरी ; मालकाच्या लक्षात येताच तिन्ही कामगार फरार

अचानक हे घडल्याने रिक्षा चालक गांगरून गेला व उपस्थितांच्या मदतीने अगोदर रिक्षाच्या बाहेर न नंतर झाडावरून खाली उतरला. या अपघाताने बघ्यांची गर्दी झाली आणि पर्यायाने वाहतूक कोंडीही झाली. सुदैवाने या ठिकाणापासून वाहतूक पोलीस हवालदार जवळ असल्याने अपघातस्थळी लगेच पोहचले. त्यांनी अगोदर बघ्यांना हटवले व वाहतूक सुरळीत केली. दरम्यान काही लोकांच्या मदतीने वाहतूक पोलीस हवालदार सागर ठाकूर आणि रामचंद्र मोरे यांनी रिक्षा खाली उतरवला व मार्गस्थ केला. ऐन वळणावरील झाडांवरील या केबल्स मूळे अपघात वाढत आहेत. झाडाच्या तळाशीही असणाऱ्या केबल्स मध्ये दुचाकीस्वारांचे पाय अडकून अपघात होतात.अशी माहिती वाहतूक पोलिसांनी दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.