नवी मुंबई : शहरातील बेलापूर ते वाशी या परिमंडळ १ अंतर्गत येणाऱ्या सर्व परिसरांत सर्वत्र नववर्षापासून तर दुसरीकडे कोपरखैरणे ते दिघा या परिमंडळ २ विभागाला मात्र सीसीटीव्ही कार्यान्वित होण्याची प्रतीक्षाच करावी लागणार आहे. शहरात ११९२ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर ठेवली जाणार आहे. सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे काम दिरंगाईने होत असून ठेकेदाराला मुदतवाढ दिली. त्यानंतरही हे काम अनेक अडथळ्यांमुळे लांबणीवर गेले. आता परिमंडळ १ मध्ये मात्र नववर्षापासून सीसीटीव्हींची नजर राहणार असल्याची माहिती पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने लोकसत्ताला दिली.

नवी महापालिका मुख्यालयात पहिल्या मजल्यावर नियंत्रण कक्षाचे काम करण्यात आले आहे. परंतु शहरात दोन्ही परिमंडळातील सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे काम पूर्ण करण्यात आल्याचा दावा ठेकेदाराने केला असून परिमंडळ २ मध्ये नेटवर्क देण्याचे काम पूर्ण न झाल्याने परिमंडळ २ मध्ये सीसीटीव्ही कार्यान्वित होण्यास उशीर लागणार आहे. कामाचे कार्यादेश दिले तेव्हा हे काम २२ नोव्हेंबर २०२२ पर्यंत पूर्ण करण्याची मुदत देण्यात आली होती. परंतु पालिकेने या कामासाठी मुदत वाढवून ३१ मार्च २०२३ पर्यंत मुदत दिली होती. परंतु अद्याप हे काम पूर्ण झाले नसून इतर शासकीय विभागांच्या परवानग्यांअभावी परिमंडळ २ मधील काम पूर्ण होत नसल्याचे चित्र आहे.

Auction vehicles of developer Andheri,
मालमत्ता कर थकवणाऱ्या अंधेरीतील विकासकाच्या तीन गाड्यांचा लिलाव
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
huge investment by nine companies in pune
पुण्यातील तळेगाव दाभाडेत ह्युंदाई स्टीलसह नऊ कंपन्यांची मोठी गुंतवणूक! रोजगार निर्मितीलाही चालना मिळणार
Peng Liyuan chats over tea with Vietnam's first lady
लेख : चिनी अध्यक्षपत्नीचे वाढते प्रस्थ
zoom phone launched in india service to begin in pune
झूम फोन सेवेला पुण्यातून सुरुवात
developers become owner of sra plot under provision in new housing policy
‘झोपु’तील भूखंडाची विकासकांना मालकी? नव्या गृहनिर्माण धोरणात तरतूद, हरकतींसाठी आजपर्यंतच मुदत
Wardha, P M Vishwakarma Yojana, artisans,
देशी कारागिरांना भरभरून प्रतिसाद, तब्बल दहा लाखाची विक्री
Inspection of pit by Geological Survey Further action only after receipt of report
‘भूवैज्ञानिक सर्वेक्षण’कडून खड्ड्याची पाहणी, अहवाल प्राप्त झाल्यानंतरच पुढील कार्यवाही

हेही वाचा : पनवेल: दर्शनाला जात असताना मंगळसूत्र हिसकावले

आता ठेकेदाराने परिमंडळ १ मधील ९५० कॅमेरे लावण्याचे व नेटवर्किंगचे काम पूर्ण केले असून व ते कार्यान्वित करण्यात येणार आहेत. महापालिका जवळजवळ १५२ कोटी रुपये खर्चातून अत्याधुनिक पद्धतीने शहर तिसऱ्या डोळ्याच्या नजरेत येणार आहे. त्यामुळे शहरात ११९२ अत्याधुनिक नवीन कॅमेरे बसविण्यात येत आहेत. सध्या जुन्या कॅमेऱ्यांच्या ठेकेदाराकडूनच काम सुरू आहे.

“शहरात पालिका नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून जवळजवळ १५० कोटी रुपये खर्चातून सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले असून परिमंडळ १ मधील काम प्रत्यक्षात नववर्षाच्या सुरुवातीला करण्याचा पालिकेचा १०० टक्के प्रयत्न आहे. तसे ठेकेदाराला आदेशित करण्यात आले आहे.” – राजेश नार्वेकर, आयुक्त, नवी मुंबई महापालिका

हेही वाचा : पनवेल: विकसकावर फसवणूकीचा गुन्हा दाखल

“नवी मुंबई महापालिकेने शहरात सीसीटीव्ही लावले असून ही कार्यप्रणाली लवकरात लवकर सुरू करावी. कारण यामुळे पोलीस विभागाला गुन्हे शोध तसेच शहरातील नागरिकांच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची अधिक मदत होणार आहे.” – विवेक पानसरे, पोलीस उपायुक्त, परिमंडळ १

१०८ कॅमेरे – २७ मुख्य चौकांसाठी

९६ कॅमेरे – सिग्नल तोडणाऱ्या वाहनचालकांवर नजर

९ थर्मल कॅमेरे – खाडी व समुद्रकिनारे

४३ कॅमेरे – पॅनिक अलार्म व कॉलबॉक्स

हेही वाचा : वसाहतींना जोडणाऱ्या उड्डाणपुलाचे काम लवकरच, तळोजा पंचानंद नगर-खारघर रहिवाशांची सोय

महापालिका-पोलीस मुख्यालयांचा समन्वय

पालिका मुख्यालय केंद्रीय नियंत्रण कक्ष पोलीस आयुक्तालय यांच्याशी जोडण्यात येणार आहे. डेटा सेंटर पोलीस मुख्यालयात असेल तसेच ते पालिकेतील नियंत्रण कक्षात असणार आहे.विभाग कार्यालय किंवा जवळच्या पोलीस ठाण्यात विभागीय चित्रीकरण असणार आहे. त्यामुळे एखाद्या विभागात घटना घडली तर ती नजीकच्या पोलीस ठाण्यातही पाहता येणार आहे.

अद्यायावत कॅमेरे

पामबीच रस्ता

ठाणे-बेलापूर रस्ता

शीव-पनवेल महामार्ग

परिमंडळ १ मधील काम ३१ तारखेपर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याची हमी दिल्याची माहिती सहशहर अभियंता शिरीष आरदवाड यांनी दिली आहे.