नवी मुंबई : नवी मुंबईतील शाहबाज गावात बेकायदेशीर राहणाऱ्या आठ बांगलादेशी नागरिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यात पाच महिला आणि तीन पुरुषांचा समावेश आहे. ही कारवाई अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने केली आहे. पायल कुटुस मलीक, रूबी काशम अली बेगम, कनिका बाबु शेख, राणी शब्बीर मुल्ला, हलीमा सलीम शेख, मोनिरूल सिध्दीकी शेख, सलीम कुका शेख, मासुद राजु राना असे यातील आरोपींची नावे असून सर्वच बांगलादेशचे नागरिक आहेत. 

अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पृथ्वीराज घोरपडे यांना शाहबाज गावातील सागर रेसिडेन्सी इमारतीतील ४०३ क्रमांकाच्या सदनिकेत काही बांगलादेशी नागरिक बेकायदेशीर राहतात अशी माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारावर अगोदर सदर माहितीची शहानिशा करण्यात आली. माहितीत तथ्य आढळून आल्याने या ठिकाणी छापा टाकला असता. तीन पुरुष आणि सहा महिला आढळून  आल्या. त्याच्याकडे भारतीय नागरिकत्वाबाबत कोणताही पुरावा अगर कागद पत्रे आढळून आले नाहीत त्यामुळे त्यांना ताब्यात घेण्यात आले.त्यांच्या विरोधात भारतीय पारपत्र , विदेशी नागरिक अधिनियम आदि कलमन्वव्ये पाच महिला आणि तीन पुरुषांवर एनआरआय पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा : शेकापच्या पाठिंब्यामुळे मावळमध्ये महाविकास आघाडीला बळ; मात्र, विधानसभेला शेकाप सोबत आघाडी होणार का ?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या व्यतिरिक्त अजून एक बांगलादेशी नासरीन सिध्दीकी अक्तर, नावाची महिला याच समूहासोबत आढळून आली होती. मात्र तिच्याकडे पारपत्र आणि वैद्यकीय उपचारार्थ देण्यात आलेला वैध व्हिसा आढळून आला. त्यामुळे तिला सोडून देण्यात आले. अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक पृथ्वीराज घोरपडे यांनी दिली.