नवी मुंबई : हापूस म्हटला की रत्नागिरी, देवगड हापूसची गोडी डोळ्यासमोर येते. देवगडचा हापूस अवीट गोडीसाठी प्रसिद्ध आहे. मात्र बाजारात आता परदेशी आंबे ही दाखल होत आहेत. आफ्रिकन मलावीनंतर आता एपीएमसी बाजारात पहिल्यांदाच केंट जातीचा आंबा आयात करण्यात आलेला आहे. हा आंबा चवीला गोड असल्याने मागणी आहे ,अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे.

भारतातून विशेषतः कोकणातील हापूस आंब्याला परदेशात खूप मोठी मागणी असते. त्याचप्रमाणे परदेशी फळांना देखील भारतीय बाजारात मागणी असते. एपीएमसी बाजारात फेब्रुवारीमध्ये देशी हापूसचा हंगाम सुरू होतो. तर गेल्या काही वर्षांपासून आफ्रिकन मलावी आंबा दाखल होत आहे. हा चवीला कोकणातील हापूस सारखाच असल्याने याला ही पसंती दिली जात आहे. नोव्हेंबर अखेरीस परदेशी मलावी हापूस दाखल होतो . दिवसेंदिवस याला मागणी वाढत आहे . मात्र यंदा बाजारात मलावी हापूसचे उत्पादन ५० टक्के असल्याने आवक रोडावली होती. एपीएमसीत मंगळवारी मलावीमधील केंट जातीचा नवीन आंबा पहिल्यांदाच आयात झाला आहे. ३०० बॉक्स दाखल झाले असून तीन ते साडे तीन किलोला २७००रुपये बाजारभाव होता. हा कोकणातील हापूस सारखा नसला तरी गुळगुळीत पोत, रसाळ आणि चवीला मधुर असल्याने पसंती दिली जात असून १५ जानेवारीपर्यंत हंगाम असणार आहे.

हेही वाचा : रविवार आरोग्य सफरीचा पाम बीच मार्ग, दर रविवारी क्रीडाप्रेमींसाठी खुला करण्याचा आयुक्तांचा प्रस्ताव

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत कोकणातील हापूस बरोबरच गेल्या काही वर्षांपासून इतर आंबेही दाखल होत आहेत. आफ्रिकन मलावी हापूसनंतर एपीएमसी आता पहिल्यांदाच मलावीतील केंट जातीचा आंबा दाखल झाला आहे. चवीला गोड असल्याने अशा रसाळ व उत्कृष्ट आंब्याला देखील पसंती दिली जात आहे.

संजय पानसरे, संचालक, एपीएमसी फळ बाजार