नवी मुंबई : नवी मुंबईत वाहन चोरी शिताफीने केल्याच्या घटना अनेक घडत आहेत. असाच प्रकार वाशी येथे राहणाऱ्या रिक्षा चालकाला आला. मारुती कलवडे असे त्या रिक्षा चालकाचे नाव असून तो एपीएमसी येथे एक प्रवासी भाडे घेऊन गेला होते. सदर प्रवासी भाडे सेक्टर १९ येथील रेस बारच्या नजीक सोडले. नेमके तेथेच एका ठिकाणी मारोती यांना त्यांचा मित्र गणेश हा दिसला. त्यामुळे त्यांनी रिक्षा (एमएच. ०२ ए एफ ५०१८) तेथेच रस्त्याच्या कडेला पार्क करून काही अंतरावर उभ्या असलेल्या गणेश यांच्याशी गप्पा मारत उभे राहिले.

हेही वाचा : पनवेल रेल्वेस्थानक परिसरात बेवारस बॅगमध्ये बॉम्बची अफवा, निघाले कपडे…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गप्पा संपल्या नंतर जेव्हा मारोती रिक्षा घेऊन जाण्यास आले त्यावेळी रिक्षा आढळून आलीच नाही. त्यांनी पूर्ण परिसर , सानपाडा स्टेशन परिसर पिंजून काढला मात्र रिक्षा आढळून आली नाही. त्यामुळे त्यांची खात्री पटली कि रिक्षा चोरीला गेली आहे. शेवटी त्यांनी याबाबत एपीएमसी पोलीस ठाण्याला दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी रिक्षा चोरीचा गुन्हा नोंद केला.