नवी मुंबई : नवी मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मोरबे धरणाच्या जवळील भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्र व मोरबे धरण ते दिघा मुख्य जलवाहिनीवर बुधवारी सकाळी १० वाजल्यापासून रात्री ८ वाजेपर्यंत भोकरपाडा जलशुद्दीकरण केंद्र येथील पाणीपुरवठा बंद राहणार असल्याने १० तासांच्या देखभाल दुरुस्तीमुळे नवी मुंबई शहराबरोबरच मोरबे येथून पाणीपुरवठा होणाऱ्या कामोठे व खारघर परिसरांनाही याचा फटका बसणार आहे. त्यामुळे संपूर्ण नवी मुंबईसह खारघर व कामोठे भागांतही पाणीपुरवठा होणार नसून गुरुवारी सकाळीही कमी दाबाने पाणीपुरवठा केला जाणार आहे. त्यामुळे बुधवारी व गुरुवारी नागरिकांना पाण्याचा जपून वापर करावा लागणार आहे.

हेही वाचा : समाज माध्यमांतील जाहिरातींच्या आधारे सट्टा बाजारात गुंतवणूक करताय? सावधान! होऊ शकते फसवणूक

Sangli, lack of road, dead body,
सांगली : रस्त्याअभावी पार्थिवाची झोळीतून वाहतूक
Sangli, fund, maintenance,
सांगली : जतमधील सिंचन प्रकल्पाच्या देखभालीसाठी ९९ कोटींचा निधी
Ghatkopar collapse
Ghatkopar Hoarding Collapse : ४० तासांनंतरही बचावकार्य सुरूच, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता!
Developers benefit from the sludge of Gangapur Demand to stop silt removal work due to leaving farmers
‘गंगापूर’च्या गाळातून विकासकांचे भले? शेतकऱ्यांना डावलल्याने गाळ काढण्याचे काम बंद करण्याची मागणी
water cut in mumbai, BMC, mumbai municipal corporation
मुंबई : पाणी कपातीचे संकट टळले पण चिंता कायम, हवामान खात्याच्या अंदाजावर पालिकेची भिस्त, पाणी जपून वापरण्याचे आवाहन
stock, dams, water,
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांत अवघा १७ टक्के साठा, पालिका प्रशासन घेणार मंगळवारी आढावा
control blood sugar
रक्तशर्करेच्या नियंत्रणासाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश
environmentalist initiative to fill dry water bodies for wildlife
उरण : वाढल्या उन्हाच्या झळा, वन्यजीवांसाठी भरला पाण्याचा तळा

मुंबईच्या तुलनेत नवी मुंबई महापालिकेच्या मोरबे धरणात ४९ टक्के जलसाठा शिल्लक आहे. परंतू शहरातील नागरिकांना सुरळीत व सुव्यवस्थिपणे पाणीपुरवठा होण्यासाठी मोरबे धरणानजीकच्या भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्राजवळ शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीवर व्हॉल्व बसवण्यासाठी तब्बल १० तासांचा अवधी लागणार आहे. त्यामुळे नवी मुंबई शहराबरोबरच खारघर व कामोठे या ठिकाणच्या भागांनाही मोरबे धरणातून होणाऱ्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार आहे. या खारघर तसेच कामोठे भागातही सिडको नोडसाठी मोरबे धरणातून जवळजवळ ५० एमएलडी पाणीपुरवठा करते. त्यामुळे या विभागांनाही पाण्याबाबत खबरदारी घ्यावी लागणार आहे.

हेही वाचा : पनवेल : रंगपंचमीत दोन गटातील हाणामारीत पोलिसांना धक्काबुक्की

मोरबे धरणातून होणाऱ्या पाणीपुरवठ्यामुळे नवी मुंबईत इतर शहरांच्या मानाने पाण्याची गंभीर समस्या जाणवत नाही. परंतू देखभाल-दुरुस्तीची कामे हाती घेतल्यावर पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी मोठा अवधी लागतो. त्यामुळे कमी-अधिक प्रमाणात पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. त्यामुळे नागरिकांनी या कालावधीत पाण्याचा वापर जपून करण्याचे आवाहन पालिकेने केले आहे.

देखभाल दुरुस्तीसाठी १० तास भोकरपाडा येथील जलशु्धीकरण केंद्रातील जलपुरवठा बंद ठेवण्यात येणार असल्याने बुधवारी संध्याकाळी शहरात होणारा पाणीपुरवठा बंद राहील तसेच गुरुवारी कमी दाबाने पाणीपुरवठा होईल. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा.

अरविंद शिंदे, कार्यकारी अभियंता, मोरबे धरण प्रकल्प