नवी मुंबई : गडहिंग्लज येथील एका संगणक केंद्राच्या मालकावर महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग केल्याप्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पीडित महिलेने राष्ट्रीय महिला आयोगाकडे तक्रार केली होती. पीडिता ही गडहिंग्लज येथे राहत होती. विवाह झाल्यावर पतीसमवेत नवी मुंबईत पीडिता राहते. ऑक्टोबर २०२० ते जानेवारी २०२२ दरम्यान संगणक केंद्रात सेवेत असताना हा प्रकार घडला. पीडिता  संगणक सेवा फर्ममध्ये सेवेत असताना कार्यालयात कोणी नसताना आरोपीने गुपचूप तिचे फोटो काढले, तसेच शटर व सीसीटीव्ही कॅमेरे बंद करून तिच्यासोबत गैरवर्तन केले होते. तसेच कामानिमित्त  आरोपींसोबत कारमधून बेळगाव आणि आंबोली येथे जात असताना आरोपीने तिचा विनयभंग केला.

हेही वाचा : जेएनपीटी साडेबारा टक्केची बैठक रद्द, प्रकल्पग्रस्तांना पुन्हा प्रतीक्षा करावी लागणार?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पीडितेचे लग्न झाल्यानंतरही आरोपीने तिचा पिच्छा सोडला नाही. तिला फोन करून सर्व काही तिच्या पतीला सांगेन, अशी धमकी देऊन तिला ब्लॅक मेल केले, असे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकाराला कंटाळून शेवटी पीडितेने महिला आयोगाकडे तक्रार केली. तर याबाबत तपास करण्याच्या सूचना वाशी पोलिसांना देण्यात आल्या. वाशी पोलिसांनी यातील आरोपी रमेश करंबळी याच्या विरोधात विनयभंग करणे, लैंगिक छळ, मनात लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करणे या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. सदर गुन्हा संबंधित पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे. अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चांदेकर यांनी दिली.