नवी मुंबई : नवी मुंबई शहरात पामबीच मार्ग, ठाणे-बेलापूर मार्ग, एमआयडीसीमधील रस्ते व शीव-पनवेल महामार्ग अशा अनेक मार्गांवर दिवाबत्तीसाठी पालिकेने पथदीवे लावले आहेत. शीव-पनवेल महामार्गावरील दिवाबत्तीची सुविधा पालिकेने सततच्या नागरिकांच्या तक्रारींमुळे आपल्याकडे हस्तातंरीत करून घेतली व त्यावर जवळजवळ ११ कोटी खर्चातून एलईडी दिवे लावले. परंतू मागील काही दिवसांपासून वाशी उड्डाणपूल ते वाशी टोलनाका या मार्गावर पथदीवे बंद असून अपघातांची शक्यता वाढली आहे.

तत्कालिन आयुक्त डॉ. रामास्वामींपासून पालिका हद्दीतून जाणाऱ्या महामार्गांवरील दिवाबत्ती सातत्याने बंद असल्यामुळे व्यवस्था रस्ते विकास महामंडळाची व लाखोल्या मात्र खाव्या लागत होत्या. तत्कालिन आयुक्त अभिजीत बांगर यांच्या कार्यकाळात महामार्गावरील वाशी ते बेलापूरपर्यंतची दिवाबत्ती पालिकेकडे हस्तातंरीत करण्यात आली आहे. पालिकेने दिवाबत्तीसाठी करोडोंचा खर्च केला आहे. परंतू अनेकवेळा महामार्गावरील पथदीवे उघड-बंद राहत असल्याचे चित्र पाहायला मिळते. त्यामुळे रात्रीच्या वेळी वाहनचालकांना अंधारामुळे रस्त्याचा अंदाज न आल्याने अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे.

हेही वाचा : नवी मुंबई : बाजारात ‘गोल्डन’ सीताफळे दाखल, मागणीत वाढ, जाणून घ्या किंमत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“पालिका हद्दीतील बेलापूर ते वाशी या मार्गावर दिवाबत्तीबाबत पाहणी करण्यात येईल. तसेच तांत्रिक अडचण असल्यास तात्काळ सुधारणा करण्यात येईल. प्रवाशांना अडचण येणार नाही, याबाबत खबरदारी घेतली जाईल”, असे विद्युत विभागाचे अभियंता मिलिंद पवार यांनी म्हटले आहे. “वाशी रेल्वेस्टेशनकडून मुंबईकडे जाताना या उड्डाणपुलावर तसेच वाशी उड्डाणपुल ते टोलनाका या परिसरात वीजबत्ती बंद असते. त्यामुळे संबंधित शासकीय आस्थापनांनी याबाबत खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे”, असे वाहनचालक दिनेश गोरे यांनी म्हटले आहे.