उरण : ओएनजीसीच्या तेल गळतीमुळे उरणमधील सागरी किनारा बाधीत झाला आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त मच्छिमारांचे पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी कोकण किनारा मच्छिमार संघटनेने केली आहे. याचे निवेदन शनिवारी उरणच्या तहसीलदारांना देण्यात आले आहे. उरणच्या पिरवाडी- नागाव किनाऱ्यावरील ओएनजीसी प्रकल्पातून तेल गळती झाली आहे. हे गळती झालेले तेल नाल्यातून भरतीमुळे समुद्राच्यावाटे शेजारील केगाव- दांडा, तसेच करंजा,आवरे सह खाडीमार्गे तालुक्यातील अनेक किनाऱ्यावर पोहचले आहे.

हेही वाचा : ओएनजीसी तेल गळती नुकसान भरपाईसाठी स्थानिक आक्रमक; उरणचा भोपाळ करायचा का? असा सवाल करीत आंदोलन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या जलप्रदूषणामुळे येथील स्थानिक मासेमारीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे किनारपट्टीवरील मच्छिमारांच्या नुकसानीचे पंचनामे करून त्यांना ओएनजीसीकडून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी सीआयटीयुच्या कोकण किनारा मच्छिमार संघटनेने उरणचे तहसीलदार डॉ. उद्धव कदम यांच्याकडे केली आहे. यावेळी कोकण किनारा मच्छिमार संघटनेचे सरचिटणीस कॉ. भूषण पाटील,अध्यक्ष संदीप पाटील, सिटुचे अध्यक्ष मधुसूदन म्हात्रे आदीजण उपस्थित होते.