पनवेल : मुंबई आणि नवी मुंबईत राहणा-या बीड जिल्ह्यातील मूळ रहिवाशांना बीड लोकसभा निवडणूकीत भाजप महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांना मतदान करण्याचे आवाहन करण्यासाठी पंकजा यांची बहिण खा. प्रितम मुंडे यांनी नवी मुंबईतील कळंबोली येथे मंगळवारी रात्री बीडवासियांच्या संवादसभेत आवाहन केले. यापूर्वीही निलेश लंके, सुयश विखे पाटील यांनीही पारनेरवासियांना मतदान करण्यासाठी कामोठे येथे प्रचार केला होता.

हेही वाचा : लोकसभा निवडणूकीच्या प्रचारात दि. बा. पाटील यांच्या नावाची चर्चा

संघर्ष अद्याप संपला नाही, मात्र बीडवासियांची साथ आहे. निवडणूकीत पारडे जड असले तरी कमळाचे बटन दाबून निवडूण देण्याचे आवाहन प्रितम मुंडे यांनी बीड जिल्ह्याच्या रहिवाशांना केले. यावेळी आ. प्रशांत ठाकूर, भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, भाजपचे जेष्ठ नेते बाळासाहेब पाटील यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.