उरण : समुद्राच्या ओहोटीमुळे मोरा मुंबई जलप्रवास दोन तासांसाठी ठप्प होणार आहे. शुक्रवारी मोरा बंदरातून मुंबईत जाणारी सायंकाळी ५ ते ८.१५ तर शनिवारी ६.४५ ते ८.३० दरम्यान ही लाँच बंद राहील. मोरा मुंबई जलप्रवासात समुद्राच्या भरती ओहोटीचे महत्व आहे. ओहोटीमुळे मोरा बंदरातून सुटणाऱ्या प्रवासी बोटी काहीकाळ बंद करण्यात येणार असून त्यांचे वेळापत्रक प्रवाशांसाठी उपलब्ध करण्यात आले असल्याची माहिती महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाचे मोरा बंदर अधिकारी नितीन कोळी यांनी दिली आहे. भरतीच्या वेळी प्रवासी बोटी धक्क्याला लागतात. मात्र ओहोटीमुळे बोटी गाळात रुतण्याची शक्यता असल्याने ही सेवा बंद करावी लागत आहे.

हेही वाचा : पनवेल : वर्षभरात २८ कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बंदरातील गाळाचा परिणाम : मोरा बंदरातून हजारो प्रवासी प्रवासी प्रवास करीत आहेत. या बंदरातील गाळ काढण्यासाठी आतापर्यंत कोट्यवधी रुपये खर्च करून ही बंदरात गाळ साचण्याची समस्या कायम आहे. त्यामुळे नाहक या मार्गावरील प्रवाशांना त्रास सहन करावा लागत असल्याचे मत उरण मधील प्रवासी मनोज ठाकूर यांनी व्यक्त केले आहे.