उरण : शहरातील अनेक रस्त्यांवर दहा, बाराच्या संख्येने घोळका करून भटके श्वान नागरिक आणि लहान मुलांवर हल्ले करू लागले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा भटक्या श्वानांची दहशत वाढू लागली आहे. अशीच स्थिती अनेक गावांतही असून तालुक्यातील भटक्या श्वानांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अशा भटक्या श्वानांची संख्या वाढल्याने निर्बीजीकरणाची मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे. उरण परिसरात शहरी व ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात भटक्या श्वानांची संख्या वाढली आहे. त्यामुळे रात्री अपरात्री आणि एकट्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांवर हल्ला करून त्यांना जखमी केले जात आहे.

हेही वाचा : मित्राशी गप्पा मारणे पडले महागात, रिक्षा गेली चोरीला 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उरण शहरात नाक्यावरील कचरा कुंड्यांवर ही भटकी श्वान दहा पंधराच्या संख्येने नागरीकांच्या अंगावर हल्ला करीत आहेत. त्याचप्रमाणे दुचाकीवरून येणाऱ्यांचा ही पाठलाग करीत आहेत. त्यामुळे वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. उरण मधील वाढत्या भटक्या श्वानांचे निर्बीजिकरण केले जात नसल्याने ग्रामीण व शहरात संख्या वाढली आहे. शहरातील सार्वजनिक ठिकाणी हे श्वान मोठ्या प्रमाणात घाणही करीत आहेत. त्यामुळे आरोग्य विभागाने पहिल्यांदा निर्बीजीकरण करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते महेश घरत यांनी केली आहे. “उरण शहरात भटक्या श्वानाच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण आणण्यासाठी निर्बीजिकरण हाच उपाय असून उरण नगर परिषद याची माहिती घेऊन यासंदर्भात तालुका पशुवैद्यकीय विभागांशी संपर्क करून उपाययोजना करील”, अशी माहिती उरण नगर परिषदेचे मुख्यधिकारी समीर जाधव यांनी दिली आहे.