उरण : नवी मुंबई महानगरपालिकेच्या एनएमएमटीच्या उरण मार्गावरील बस ब्रेक डाऊन होऊन नादुरुस्त होण्याच्या घटनांत वाढ झाली आहे. सोमवारी दुपारी साडेबारा वाजता करळ जासई मार्गावरील करळ पुलाखाली ३० क्रमांकाची बस बंद पडल्याने नवी मुंबईत जाणाऱ्या प्रवाशांना आपला प्रवास अर्धवट सोडावा लागला. अशाच प्रकारे मंगळवारी दास्तान फाटा येथे ही एक बस बंद पडली होती. उरणमध्ये अशा प्रकारच्या घटना वारंवार घडत असल्याने प्रवाशांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा : पनवेल : उलवेतील घरे सहा लाखांनी स्वस्त सदनिकाधारकांना दिलासा, किमंत २७ लाख रुपये

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उरण ते नवी मुंबईतील मार्गावरील विद्यार्थी, महिला व चाकरमानी यांच्या प्रवासासाठी महत्वाच्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या एनएमएमटीच्या बस सातत्याने बंद पडू लागल्या आहेत. या बसेस ऐनवेळी रस्त्यात बंद होत असल्याने प्रवासी त्रस्त झाले आहेत. नवी मुंबईत जाणाऱ्या इलेक्ट्रिक बस बंद पडत आहेत. यामध्ये भर पावसात इलेक्ट्रिक व साध्या बसही बंद पडण्याच्या घटनांत वाढ झाली आहे. नवी मुंबई महानगर पालिकेच्या एनएमएमटी सेवेच्या बसेस उरणपर्यंत येत आहेत. यातील अनेक बस या पावसामुळे बंद पडू लागल्याने येथील प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. उरणच्या शहरी भागांसह पूर्व विभागातील नागरिकांना नवी मुंबई महानगरपालिकेच्या एनएमएनटी बस सेवा ही महत्वपूर्ण ठरली आहे. या सेवेमुळे येथील चाकरमानी, विद्यार्थी व व्यावसायिक यांना लाभ होऊ लागला आहे.